पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 16. संजय उवाच । इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः । संवादमिममौषमद्भुतं रोमहर्षणम् ।। ७४ ॥ व्यासप्रसादाच्छ्रतवानेतद्गुह्यमहं परम् । योग योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ।। ७५ ॥ मला (कर्तव्यधर्माची) स्मृति झाली, मी (आतां) निसंदेह होऊन राहिली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे (युद्ध) करितो. गीताधर्मांतहि संसार सोडण्यास सांगितले आहे अशी ज्यांची सांप्रदायिक समजूत आहे त्यांनी शेवटच्या म्ह. ७३ व्या श्लोकाधी बरीच निराधार ओढाताण केली आहे. अर्जुनाला कशाची स्मृति राहिली नव्हती ते पाहं गेले, तर दुसऱ्या अध्यायांत (२.७ )"माझा धर्म किंवा कर्तव्य माझ्या मनाला कळत नाहींस झाले आहे" (धर्मसंमूढ- चेताः), असे त्याने म्हटलेले आढळून येते; आणि स्याच कर्तव्यधर्माची आता त्याला स्मृति झाली असा वरील श्लोकाचा सरळ अर्थ आहे. यद्वास प्रवृत्त करण्यासाठी गीता उपदेशिली असून जागोजाग " म्हणून तूं युद्ध कर" असे सांगितले असल्यामुळे (गी. २.१८, २.३० । ३.३०, ८.७ ११.३४) "तुमध्या म्हणण्याप्रमाणे करितों" याचा अर्थ "युद्ध करितो" असाच होतो. असो; श्रीकृष्णार्जुनसंवाद संपला; आतां महाभारतातील कथासंदभांप्रमाणे धृतराष्ट्राला ही कथा सांगितल्यावर संजय आपला उपसंहार करितो--] संजय म्हणला-(७४) याप्रमाणे अंगावर रोमांच उभे करणारा वासुदेव व महात्मा अर्जुन यांचा हा अभ्दुत संवाद मी ऐकिला. (७५) व्यासांच्या अनुग्रहामुळे हे परम गुह्य म्हणजे योग अर्थात् कर्मयोग साक्षात् योगेश्वर श्रीकृष्ण स्वतःसांगत असतां मला ऐकावयास मिळाला.