पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८, बुद्धियोगमुपाश्रित्यः मञ्चित्तः सततं भव ॥ ५७ ॥ मश्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनंक्ष्यसि ॥ ५८ ॥ S यदहकारमाश्रित्य न योस्त्य इति मन्यसे । मिथ्यप व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९॥ स्वभावजेन कौतय निबद्धः स्वेन कर्मणा। कतु नेच्छसि यन्मोहात्कारप्यस्यवशोऽपि तत् ॥६॥ (५७) मनाने सर्व कर्मे मला संन्यस्य म्ह० अर्पण करून मत्परायण होत्साता (साम्य) बुद्धियोगाच्या आश्रयाने माझ्या ठायीं नेहमी चित्त ठेव. ['बुद्धियोग' शब्द पूर्वी दुसन्याच अध्यायांत आला आहे (२.४९), व तेथे त्याचा अर्थ फलाशेच्या ठिकाणी बुद्धि न ठेवितां कर्मे करण्याची युक्ति किंवा समत्वबुद्धि असा आहे. हाच अर्थ प्रकृतस्थलोहि विवक्षित असून कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ म्हणून दुसन्या अध्यायात जे तस्य सांगितले त्याचाच हा उपसंहार आहे. कर्मसंन्यास म्हणजे काय हेहि यांतच "मनाने (म्ह० साक्षात् कमस्यागाने नव्हे तर केवळ बुद्धीने) मला सर्व कर्मे अर्पण करून " या शब्दांनी सांगितले असून तोच अर्थ मागे गीता ३.२० व ५, १३ यांत वर्णिला आहे.] (५८) माझ्या ठायीं चित्त ठेविलेंस म्हणजे तं माइया अनुग्रहाने सर्व संकटें म्हणजे कर्माची शुभाशुभ फल तरून जाशील. पण अहंकाराने माझे न ऐकशील तर ( मात्र) नाश पावशील. । [५८ व्या श्लोकाचे अखेर अहंकाराचा जो परिणाम सांगितला त्याचा आतां जास्त खुलासा करितात-- (५९) मी लढणार नाही असे जे तूं अहंकाराने मानीत आहेस, तो तुझा निश्चय फुकट आहे. प्रकृति म्ह० स्वभाव तुला ते करावयास लावील. (६०) हे कौतया ! आपल्या स्वभावजन्य कर्माने बद्ध झाल्यामुळे मोहाने