पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ श्रीमद्भगवद्गोता. चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । किंवा त्रिगुणातीत यांची जी वर्णने आहेत त्यांसारखेच हे वर्णन आहे किंबहुना काही शब्दाहे त्याच वर्णनांतून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ ५३ व्या श्लोकांतला 'परिप्रह' शब्द सहाव्या अध्यायांत (५.१०) योग्याच्या वर्णनांत आला आहे; ५४ च्या श्लोकांतील "न शोचति न कांक्षति" ही पदें बाराव्या अध्यायांतील भनिमार्गाच्या वर्णनांत आहेत. (१२.१७) आणि विविक्त ह्मणजे निवडक (एकान्त) स्थली रहाणे हे शब्द पूर्वी गी. १३.१० श्लोकांत आहेत. कर्मयोग्याला प्राप्त होणारी ही अखेरची स्थिती आणि कर्मसंन्यासाप्रमाणे प्राप्त होणारी अखेरची स्थिती, केवळ मानसिकदृष्ट्या, एकच असल्यामुळे, ही वर्णने आमच्याच मार्गातील आहेत असे समजण्यास संन्यासमागाँतील रीकाकारांस सवड झाली आहे. परंतु हा मार्ग खरा नव्हे हे पूर्वी अनेक वेळां सांगितले आहे. असो. सन्यास ह्मणजे कम सोडणे नव्हे, फलाशेच्या त्यागाप्त संन्यास ह्मणावयाचे असा संन्यास या शब्दाचा अर्थ करून, अन्नस्यागादि कमें

काम्य अप्लोत, निम्ब असोत वा नैमित्तिक असोत, ती इतर सर्व कर्मा-

प्रमाणेच फलाशा सोडून उत्साहाने व समतेने केली पाहिजेत असे या अध्यायाचे आरंभी प्रतिपादन केले आणि नंतर जगांतील कर्म, का. बुद्धि वगरे विषय गुण भेदाने नानाविध असले तरी त्यांत साविक श्रेष्ठ असे दाखवून, चातुर्वर्ण्यव्यवस्थेने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली सर्व कमैं आसक्ति विरहित होऊन केल्याने त्यांतच परमेश्वराचे यजन पूजन घडून क्रमाक्रमाने त्यानेच अखेर परबमाची किंवा मोक्षाची प्राप्ती होत्ये, मोक्षासाठी दुसरे अनुदान करावयास नको, किंवा कर्मत्याग. रूप संन्यासहि घावयास नको, एका कर्मयोगानेच मोक्षासुद्धा सर्व सिद्धि प्राप्त होतात, असा गीताशास्त्राचा इत्यधे सांगितला. आता हाच कर्मयोगमार्ग स्वीकारण्याबद्दल अर्जुनास पुन: अखेरचा उपदेश करितात---]