पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. ईश्वरः सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ॥ ६ ॥ तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत्प्रसादात्परा शान्ति स्थान प्राप्स्यसि शाश्वतम ॥१२॥ इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया। विनश्यैतदशेषेण यथेच्छासे तथा कुरु॥६३। में तूं करूं इच्छित नाहीस तेच परतंत्र (म्ह. प्रकृतीच्या स्वाधीन ) होऊन तुला करावे लागेल. (६१) हे अर्जुना ! ईश्वर सर्व भूतांच्या हृदयांत राहून यंत्रावर चढविल्याप्रमाणे सर्व भूतांना (आपल्या) मायने चाळवीत असतो. (६२) म्हणून हे भारता! सर्व भावाने त्यालाच शरण जा. त्याच्या अनुग्रहाने परम शान्ति व निस्वस्थान तुला प्राप्त होईल. (६३) याप्रमाणे गुह्यांतले गुह्य असें हैं ज्ञान तुला मी सांगितले, याचा पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेस येईल ते कर. 1 [वरील श्लोकांत कर्मपारतंत्र्याचे जे गूढ तस्व सांगितले आहे त्याचा विचार गीतारहस्याच्या १००पा प्रकरणांत सविस्तर केलेला आहे तो पहा. आत्मा हा स्वतः जरी स्वतंत्र आहे तरी जगाच्या म्हणजे प्रकृ. तीच्या व्यवहाराकडे नजर दिली असता असे आढळून येते की, कर्माचे जें रहाटगाडगें अनादि कालापासून चालत आहे त्यावर आत्म्याची काही सत्ता नाही. आपण न इच्छितां किंबहुना आपल्याला नको असताहि शेकडों, हजारों गोष्टी, जगांत चालल्या असून त्यांच्या व्यापाराचे परिणामहि आपणावर घडत असतात, किंवा त्या व्यापारांतलाच काही भाग आपणांस करावा लागतो, नाही म्हणून चालत नाही. अशा वेळी शहाणा पुरुष, आपली बुद्धि निर्मल ठेवून, आणि सुस्न व दु:ख सार• खेंच समजून ही कामे करीत असतो, आणि मूर्ख त्यांचे पाशात गुंततो, हा दोघांच्या वर्तनांतला महत्वाचा भेद आहे. " भूते आपल्या प्रकृ.