पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- - - १३४ श्रीमद्भगवद्गीता. $$ नियतं संगरहितमरागद्वेषतः कृतम्। अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३ ॥ यत्तु कामे सुना कर्म साहंकारेण वा पुनः। कियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतन् ॥ २४ ॥ जे काय जाणावयाचे ते हेच असून (गी. १३. १६) यांतच ज्ञानाची परमावधि होत्य; कारण, सर्वच एक झाल्यावर एकीकरणाच्या ज्ञान- क्रियेस पुढे अवकाशच रहात नाहीं (गीतार. पृ. २३० पहा). एकी. करण करण्याची ज्ञानाची ही क्रिया कशी चालत्ये याचे गीतारहस्याच्या नवव्या प्रकरणांत निरूपण केले आहे (पृ. २१२ व २१३) ते पहा. हेच सात्विक ज्ञान मनांत बिधले म्हणजे देहस्वभावावर त्याचा जो परिणाम घडतो त्याचे वर्णन, दैवी संपत्तीचे गुणवर्णन म्हणून, सोळा- म्या अध्यायाचे आरंभी आले असून तेराच्या अध्यायांत (१३.७.११) अशा प्रकारच्या देहस्वभावासच 'ज्ञान' हे नांव दिले आहे. यावरून 'ज्ञान' या शब्दाने (1) एकीकरणाच्या मानसिक क्रियेची पूर्तता, आणि () त्या पूर्ततेमुळे देहस्वभावावर घडलेला परिणाम, असे दोन्ही अथे गीतेत विवक्षित आहेत असे दिसून येते. म्हणून विसाव्या श्लोकांत दिलेलें ज्ञानाचे लक्षण दिसण्यांत जरी मानसिक क्रियात्मक दिसले तरी त्यांतच सदर ज्ञानाने देहस्वभावावर होणाच्या परिणामाचा समा- वेश इष्ट आहे, हे गीतारहस्याच्या नवव्या प्रकरणाच्या अखेर (प. २४५ व २४६) स्पष्ट केले आहे. असो; ज्ञानाचे भेद सांगितले. आता कर्माचे भेद सांगतात-] (२३) फल प्राप्तीची इच्छा न धरणारा पुरुष, प्रीति किंवा द्वेष (मनांत) न ठेवितां, आसक्तिविरहित (स्वधर्माप्रमाणे) नियत म्हणजे नेम. लेले में कर्म करितो ते (कर्म) साविक म्हटले आहे. (२४) पण काम महणजे फलाशेची इच्छा धरणारा किंवा अहंकारबुद्धीचा (पुरुष) पुष्कळ