पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता. भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३३५ अनुबंधं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५ ॥ $$ मुक्तसंगोऽनवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्धयसिद्धयोनिर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥२६ ॥ आयासाने में कर्म करितो स्याला राजस म्हणतात. (२५) अनुबंध म्हणजे पुढे होईल काय, पौरुष म्ह० आपले सामर्थ्य किती, आणि (त्यांत) नाश अगर हिंसा घडेल किवा नाही, यांचा विचार न करिना मोहाने में कर्म आरभिले जाते, त्याला तामस म्हणतात. । [या तीन प्रकारच्या कर्मात सर्व प्रकारच्या कर्माचा समावेश होतो. निष्काम कर्मासच सात्विक म्हणजे उत्तम कां म्हटले याचे विवेचन गीतारहस्याच्या ११ च्या प्रकरणांत केले आहे ते पहा. हेच खरे अक. महेि होय (गी. ४.१६ वरील टीप पहा). कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ असा गीतेचा सिद्धांत असल्यामळे कर्माची वरील लक्षणे सांगताना कांच्या बुद्धीचा दर वेळी उल्लेख आलेला आहे. कर्माच्या केवळ बाह्य परि- णामावरूनच ते साविक का तामस हे ठरविलेले नाही, हे लक्षांत ठेविले पाहिजे (गीतार. प्र. १२ पृ. ३७१ पहा). तसेंच फलाशा 'सुटली म्हणजे मागचापुढचा सुमार अगर सारासारविचार न पहाता वाटेल ते करावे असहि अर्थ समजावयाचा नाही, २५ व्या श्लोका वरून सिद्ध होते. कारण अनुबंध व फल न पहाता केलेले कर्म तामस होते, साविक नव्हे, असें २५ व्या श्लोकांत निश्चित म्हटले आहे (गीतार. पृ. ३७९ पहा). आता याच तत्वाप्रमाणे कर्त्याचे जे भेद होतात ते सांगतात-] (२६) ज्याला आसक्ति नाही, जो 'मी' व माझे म्हणत नाही, कार्य सिद्ध होचो न होवो (दोन्ही वेळी) जो (मनाने) अधिकृत; (तथापि) जो सृति व उत्साह यांनी युक्त होस्साता कर्म करितो, त्यास साविक - - --- - - .- .