पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३३३ $ सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २० ।। पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् । वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१ ॥ यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्य सक्तमहैतुकम् । अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ।। २२ ॥ (२०) विभक्त म्हणजे निरनिराळ्या सर्व भूतांत, एकच अविभक्त व अव्यय भाव किंवा तत्त्व आहे, असें ज्या ज्ञानानं कळते ते साविक ज्ञान असे समज. (२१) सर्व भूतांमध्ये भिन्नभिन्न प्रकारचे नाना भाव आहेत असा पृथक्त्वबोध ज्या झानाने होतो तें ज्ञान राजस समज.(२३) परंतु हेच काय ते सर्वस्व म्हणून एकाच गोष्टीत निष्कारण व तत्त्वार्थ न जाणितां गुंतून राहिलेले जे अल्पज्ञान ते तामस म्हटले आहे. निराळ्या ज्ञानाची लक्षणे फार व्यापक आहेत. आपली बायका मुले हाच काय तो सर्व संसार, हे ज्ञान तामस होय. यापेक्षा जरा वर चढले म्हणजे दृष्टि अधिक व्यापक होऊन आपल्या गावांतला अगर देशांतला मनुष्य आपला वाटू लागतो; तथापि निरनिराळ्या गांवातील अगर देशांतील लोक निरनिराळे ही बुद्धि अद्याप कायम असत्ये. हे ज्ञान राजस होय. पण याहिपेक्षां वर चढून सर्वांभूती एक आत्मा हे ओळावले म्हणजे हे ज्ञान पूर्ण व साविक झाले. सारांश, 'विभक्तांत आविभक्त' किंवा ' नानात्वांत एकत्व ' ओळखणे हे ज्ञानाचे खरे लक्षण होय, आणि याप्रमाणे "नेह नानास्ति किंचन" या जगांत नानात्व नाही, हे ज्याने ओळखिलें तो मुक्त, आणि "मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानव पश्यति" (बृ. ४.४.१९)-जो या जगांत नानास्व पहातो तो जन्ममरणाच्या फेन्यांत पडतो-असें वृहदारण्य. कांत व कठोपनिषदात वर्णन केलेले आहे (कठ. ४.११). या जगांत .... - - - - - - - - - -..