पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः। प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९ ॥ करण, कर्म व कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे. (१९), ज्ञान, कर्म आणि कर्ता (प्रत्येकी सत्व, रज व तम या) गुणभेदाने तीन तीन प्रकारची आहेत असे गुणसंख्यानशास्त्रांत म्ह० कापिलसांख्यशास्त्रांत म्हटले आहे. ते (प्रकार) जसेच्या तसे (तुला सांगतों) ऐक. [कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत. कोणतेहि कर्म इंद्रियांनी घडण्यापूर्वी त्याचा मनाने निश्चय करावा लागतो. म्हणून या मानसिक विचारास 'कर्मचोदना' म्ह० कर्म करण्याची प्रथम प्रेरणा असे म्हणतात; व ती साहजिकरीत्या ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता याप्रमाणे तीन प्रकारची असत्ये. उदाहरणार्थ प्रत्यक्ष मडके करण्यापूर्वी मला अमुक करावयाचे (ज्ञेय), व ते अमक्या रीतीने होईल (ज्ञान), असे कुंभार (ज्ञाता), आपल्या मनाने ठरवीत असतो ही कर्मचोदना झाली. मनाचा याप्रमाणे निश्चय झाल्यावर तो कुंभार (कर्ता) माती, चाक वगैरे साधने (करण) मिळवून प्रत्यक्ष मडके (कर्म) तयार कारतो. हा कर्मसंग्रह झाला, मडके हे कुंभाराचे कर्म आहे पण त्यासच मृत्तिकेचे कार्य असेंहि म्हणतात. असो; कर्मचोदना हा शब्द मानसिक किंवा अंत:करणांतील क्रियेचा बोधक असून, कर्मसंग्रह या शब्दाने त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात, हे यावरून दिसून येईल. कोणत्याहि कर्माचा पूर्ण विचार करावयाचा म्हणजे 'चोदना' व 'संग्रह' ही दोन्ही पाहिली पाहिजेत. पैकी ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता (क्षेत्रज्ञ) यांची अध्यात्मदृष्ट्या लक्षण पूर्वी तेराव्या अध्ययांत (१३.१८) सांगितली आहेत. तथापि क्रियारूपी 'ज्ञानाचे लक्षण थोडें निराळे असल्यामलें या त्रयीपैकी ज्ञान आणि दसया प्रयापैकी कर्म व कर्ता यांच्या व्याख्या आतां सांगतात--]