पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. १९ म चैतद्विन्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रः ॥ कार्पण्यदोपोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः। यच्छ्यः स्यानिश्चितं हि तन्मे शिपयस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ न हि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्छपणमिद्रियाणाम् । अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥ संजय उवाच । एवमुक्त्वा हपीकेशं गुडाशः परंतपः। (६) आम्ही जय मिळवावा किंवा आम्हांस (स्यांनी) जिंकावें, या दोहोंपैकी आम्हांस श्रेयस्कर कोणते हहि कळत नाही. ज्यांना मारून जिवंत रहण्याची इच्छा नाही तेच हे कौरव (युद्धास ) समोर उभे आहेत ! {या श्लोकांत 'पुष्कळांचे पुष्कळ सुख' यासारखा कर्माकर्माचे लाघव. गौरव ठरविण्याची कसोटी उद्दिष्ट असून कोणाचा जय होणे बरे, हैं त्याप्रमाणे ठरविता येत नाही, असा एकंदर आशय आहे. गीतारहस्य पृ. ८५ व ८६ पहा.] (M) दैन्याने माझी स्वाभाविक वृत्ति नष्ट होऊन (माया) धर्माचा म्हणजे कर्तव्याचा मनाला मोह पडल्यामुळे मी तुम्हाला विचारीत आहे. जे निश्चयेंकरून श्रेयस्कर असेल ते मला सांगा. मी तुमचा शिष्य, तुम्हांला शरण आलेल्या मला बोध करा. (८) कारण पृथ्वीवर निष्कंटक समृद्ध राज्य किंवा देवांचहि ( स्वर्गाचे) स्वामित्व मिळाले तरी इंद्रियांना शोषून टाकणारा हा माझा शोक में दूर करील अस काहींच ( साधन) मला दिसत नाही. संजय म्हणाल-(९) याप्रमाणे शत्रूला ताप देणारा जो गुडाकेश म्हणजे अर्जुन त्याने हृषीकेशाला (श्रीकृष्णाला) सांगित. स्यावर " मी लढणार नाही" असे गोविंदाला सांगून (तो) आपला