पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥ तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १० ॥ स्तब्ध राहिला ! (१०) ( नंतर ) हे भारता (धृतराष्ट्रा) ! दोन्ही सैन्यांचे मध्ये खिन्न होऊन बसलेल्या त्या अर्जुनास श्रीकृष्ण हसल्यासारखे करून असे म्हणाले. _[ एके बाजूस क्षत्रियाचा स्वधर्म व दुसरीकडे गुरुहत्या व कुलक्षय या पातकांची भीति याप्रमाणे ओढीत असतां मरा का मारावे" या मोहात पडून लढाई सोडून भिक्षा मागण्यास तयार झालेल्या अर्जुनास त्याचे या जगांत बरे कर्तव्य काय याचा भगवान आतां उपदेश करीत आहेत. लढाईसारख्या घोर कर्माने आत्म्याचे कल्याण होणार नाही अशी अर्जुनाची शंका होती. सबब ज्या थोर पुरुषांनी परब्रह्माचं ज्ञान करून घेऊन आपल्या आत्म्याचे पूर्ण कल्याण करून घेतलें से या जगांत कसे वापतात, येथपासूनच गीतेतील उपदेशास सुरुवात आहे. भगवान म्हणतात की, जगाच्या रहाटीकडे पाहीले तर आत्मज्ञानी पुरुषाच्या आयुष्यक्रमणाचे अनादिकालापासून दोन मार्ग चालत आले आहेत असे दिसून येतें (गी. ३. ३, व गीतारहस्य प्र. १ पहा). आत्मज्ञान संपादन केल्यावर शुकासारखे पुरुष संसार सोडून आनंदाने भिक्षा मागत हिंडतात, तर जनकासारखे दूसरे आत्म- ज्ञानी ज्ञानोत्तरहि स्वधर्माप्रमाणे लोककल्याणार्थ जगाच्या शेकडो उलाढालीत आपला वेळ घालवीत असतात. पहिल्या मार्गास सांख्य किंवा सांख्यनिष्ठा असे म्हणतात, आणि दुसन्यास कर्मयोग किंवा योग असें नांव आहे (श्लो. ३१ पहा) पण या दोन्ही निष्ठा जरी प्रचारांत असल्या तरी त्यांतले त्यांत कर्मयोग अधिक श्रेष्ठ असा गीतेचा सिद्धान्त आहे (गी. ५.२) हे पुढे सांगण्यात येईल. या दोन निष्ठारेकी