पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जना. दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥५॥ कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राम मचेतसः । मां चैवांतः शरीररथं तान्विद्धधासुरनिश्चयान् ॥ ६ ॥ यजन करितात; राजस यक्षराक्षसांचे, आणि याशिवाय बाकीचे तामस प्रेत व भूतगण यांचे यजन करितात. शास्त्रावर श्रद्धा असणान्या मनुष्यांचेहि सत्वादि प्रकृतिगुणभेदाने जेि तीन भेद होतात ते आणि त्यांचे स्वरूपहि सांगितले. आतां शास्त्रा. वर श्रद्धा नसल्यामुळे कामपरायण व दांभिक लोकांचा वर्ग कोणता ते सांगतात, हे लोक सास्तिक नव्हेत हे उघड आहे. पण त्यांस नुस्तें तामस असेंहि म्हणता येत नाही, कारण त्यांनी कम शास्त्राविरुद्ध असली तरी ती करण्याकडे त्यांची प्रवृत्ति असत्ये व प्रवृत्ति रजोगुणाचा धर्म आहे. सारांश अशा लोकांस साविक, राजस किंवा तामस ही विशेशणे एक- एकटी लागू पडत नाहीत. म्हणून देवी व आसुरी असे निराळे दोन वर्ग करून त्यांपैकी या दुष्ट लोकांचा आसुरी वर्गात समावेश करितात; आणि तोच अर्थ पुढील दोन श्लोकांत वर्णिला आहे. ] (५) परंतु जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होस्साते, काम आणि आसान यांच्या जोरावर, शास्त्रविरुद्ध घोर तप करितात, (६) आणि शरीरातील पंचमहाभूतांदिकांच्या समुदायासच नव्हे तर शरीरान्तर्गत असणान्या मलाहि कष्टवितात ते अविवेकी आसुर बुद्धीचे असे समज. [अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरे झाली. मनुष्याची श्रद्धा ज्याच्या त्याच्या प्रकृतिस्वभावामुळे साविक, राजस किंवा तामस असू शकेल; आणि त्याप्रमाणे त्याच्या कमांत भेद पडून त्याच्या कर्मानुरूप त्याला निरनिराली गति मिळेल. तथापि एवढ्यानेच कोण आसुरी वर्गा-