पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १७. " FF आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः । यक्षस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं गुणु ॥ ७ ॥ आयुःसत्त्ववलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः॥ ८॥ कदवम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९ ॥ पडतो असे नाही. आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून व शास्त्राप्रमाणे वागून प्रकृतिस्वभाव हळहळू सुधारणे हैं प्रत्येकाचे काम आहे. है न करितां दुष्ट प्रकृतिस्वभावाचाच अभिमान धरून शास्त्रविरुद्ध जे आच- रण करितात ते आसरी बुद्धीचे म्हणावयाचे असा या श्लोकांचा भावार्थ आहे. आतां श्रद्धेप्रमाणेच आहार, यज्ञ, तप व दान यांचे सव, रज व तम या प्रकृतिगणांमुळे निरनिराळे भेद कसे होतात व त्यामुळे स्वभाववैचिच्याबरोबरच क्रियावैचित्र्यहि कसे सत्पन्न होते याचे वर्णन करितात-] (७) आतां प्रत्येकाला आवडणाच्या आहाराचाहि तीन प्रकार होतात. आणि तोच प्रकार यज्ञ, तए व ज्ञान यांचा होय. त्यांचा हा भेद सांगतों ऐक. (८) सात्त्विक पुरुषास आवडणारे आहार आयुष्य, सात्त्विक वृत्ति, बल, आरोग्य, सुख आणि प्रीति ही वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, शरीरांत मुरून चिरकाल रहाणार आणि मनाला आनंददायक असतात. (९) राजप्त पुरुषाला प्रिय होणारे आहार कटु म्हणजे तिखट, आंबट, खारट, अति उष्ण, झणझणीत, रुक्ष, दाहकारक आणि दुःख, शोक व रोग उत्पन्न करणारे असतात. । [संस्कृतांत कटु म्हणजे तिखट आणि तिक म्हणजे कडू असा अर्थ असून, त्याप्रमाणे संस्कृत वैद्यक ग्रंथांत मिध्ये कट व निंब तिक्त असे