पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १७. ३०९ यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः। प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥४॥ [दुसन्या श्लोकांत ' सत्त्व शब्दाचा अर्थ देहस्वभाव, बुद्धि किंवा । अंत:करण असा आहे. कठोपनिषदांत 'सत्त्व' शब्दाचा हा अर्थ आला असून (कठ. ६.७), वेदान्त पत्राच्या शांकरभाष्यांतहि क्षेत्रक्षेत्रज्ञ' या पदाऐवजी 'सत्वक्षेत्रज' हैं पद आलेले आहे (वे. सू. शां. भा. १.२.१२). सारांश, दुसन्या श्लोकांतील स्वभाव' आणि तिसन्या श्लोकांतील सत्व' हे दोन्ही शब्द या ठिकाणी समानार्थक आहेत. कारण, स्वभाव म्हणजे प्रकृति व प्रकृतीपासूनच पुढे बुद्धि व अंत करण. होते हा सिदान्त सांख्य व वदना या दोहों सहि मान्य आहे. “ज्याची जशी श्रद्धा तसा तो होतो तत्व "देवांची भक्ति करणारे देवांस" इत्यादी जे सिद्धान्त पूर्वी आलेले अहेत त्यांचाच सामान्यानुवाद आहे (गी. ७.२०.२३, ९.२५) व त्याचे विवेचन आम्हीं गीतारहस्याच्या तेराव्या प्रकरणांत केले आहे (गीता. पृ. ४२०-४२६ पहा) ज्याची जशी बृद्धि तसे त्याला फल, आणि ही बुद्धि होणे किंवा न होणे हे प्रकृतिस्वभावावर अवलंबून असते, असे म्हटल्यावर त्यांत सुधारणा कशी व्हावी असाहि प्रश्न उद्भवतो. आत्मा स्वतंत्र असल्यामुळे हा देह- स्वभाव अभ्यासाने आणि वैराग्याने हळूहळू पालटतां येतो हे त्याचे उत्तर होय, व त्यांचे विवेचन गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत (पृ. २७४-२७१) केले आहे ते पहा. सध्या श्रद्धाभेद का व कसे कसे होतात एवढेच पहाणे आहे. म्हणून प्रकृतिस्वभावाप्रमाणे श्रद्धा बदलत्ये असे सांगितल्यावर आतां प्रकृतिहि ज्या अभी सत्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त आहे, त्या अर्थी श्रद्धेचेहि मनुष्यामनुष्यांत कोणत्या प्रकारचे त्रिधा भेद होतात, व त्याचे परिणाम काय घडतात, ते सांगतात-] (४)साविक म्हणजे सत्वगुणवान स्वभावाचे जे पुरुष ते देवांचे