पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २८७ 5$ न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा। आहे (श्वे. ६.६). पण हा वृक्ष कोणता हे येथे स्पष्ट सांगितले नाही; आणि मुंढकोपनिषतांत (३.१) याच वृक्षावर दोन पक्षी (जविारमा व परमात्मा) बसलेले असून एक पिंपळ म्हणजे पिंपळाची फळें खातो असें ऋग्वेदांतलॅच वर्णन घेतलेले आहे. पिंपळ आणि वह यांज- खेरीज या संसारवृक्षाच्या स्वरूपाची तिसरी कल्पना म्हटली म्हणजे औदुंबर होय; व पुराणांतून हा दत्तात्रेयाचा वृक्ष मानिला आहे. सारांश, परमेश्वराच्या मायेने उत्पन्न झालेले जग म्हणजे एक मोठा पिंपळ, वड किंवा औदुंबर आहे या तिन्ही कल्पना प्राचीन ग्रंथांतून आढळतात; व याच कारणामुळे विष्णुसहस्रनामांत " न्यग्रोधोदुंबरो श्वस्थाः " अशी विष्णूची वृक्षात्मक तीन नांवें दिली असून ( म. भा. । अनु. १४९-१०), हेच तीन वृक्ष प्रचारांतहि देवतात्मक व पूजाई मानीत असतात. शिवाय विष्णुसहस्रनाम व गीता हे दोन्ही महाभार- ताचे भाग आहेत, व विष्णुसहस्रनामांत जर औदुंबर वड (न्यग्रोध) आणि अश्वत्थ अशी तीन निराळी नांवे दिलेली आहेत, तर 'अश्वस्थ' शब्दाने गीतेतहि पिंपळ ( औदुंबर अगर वट नव्हे) हाच अर्थ घेतला पाहिजे, व मूळचा अर्थहि तोच आहे."छंदांसि म्हणजे वेदहीं ज्याची 'पाने" वाक्यांतील छंदांसि शब्दांत छद-झांकण हा धातु मानून (छां. १.४.२. पहा) वृक्षाला झाकणाऱ्या पानांशी वेदाचें साम्य वर्णिले आहे; आणि हे सर्व वर्णन वैदिक परंपरेप्रमाणे असल्यामुळे है ज्याने जाणिलें तो वेदवेत्ता म्हणावयाचा असे अखेर म्हटले आहे. येणेप्रमाणे वैदिक वर्णन झाले; आतां याच वृक्षाचे दसऱ्या प्रकारे म्हणजे सांख्य- शास्त्राप्रमाणे वर्णन करितात-] (२) सत्वादि (तीन) गुणांनी पोसलेल्या आणि ज्यापासून (शब्द स्पर्श-रूप-रस व गंध-रूपी) विषयांचे अंकुर फुटलेले आहेत, अशा त्याच्या शाखा खाली आणि वरहि पसरलेल्या आहेत; आणि अखेर कर्माचे