पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ श्रीमद्भगवद्गीता. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३ ॥ रूप पावणाच्या त्याच्या मुळ्या खालोहि मनुष्यलोकांत वाढत लांब गेल्या आहेत. [सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृति व पुरुष ही दोनच तत्वे आरंभी अप्सन 'पुरुषापुढे त्रिगुणात्मक प्रकृति आपला पसारा मांडूं लागली म्हणजे महदादि तेवीस तवं उत्पन्न होऊन त्यांचा ब्रह्मांडवृक्ष कसा बनतो याच गीतारहस्याच्या ८ व्या प्रकरणांत (पृ. १७६) सविस्तर निरूपण केले आहे. परंतु वेदान्तशास्त्राच्या दृष्टीने प्रकृति स्वतंत्र नसून परमेश्वरा- चाच एक अंश असल्यामुळे त्रिगुणात्मक प्रकृतीचा हा पसारा स्वतंत्र वृक्ष न मानितां ' ऊर्ध्वमूल ' पिंपळाच्याच या शाखा होत असा वेदा- न्तशास्राचा सिद्धान्त आहे. या सिद्धान्ताला अनुसरून पहिल्या श्लोकांत वर्णिलेल्या वैदिक अधःशाखा' वृक्षाच्या " विगुणांनी पोसलेल्या " शाखा • खाली'च नव्हे तर 'घर' हि पसरलेल्या आहेत, असे आता थोडे निराळ स्वरूप वर्णिलं असून, कम विपाकप्रक्रियेचा धागाहि त्यांत अखेर ओवून दिला आहे. अनुगतित ब्रह्मवृक्षाचे जे वर्णन आहे त्यांत या वृक्षाच्या वैदिक व सांख्य वर्णनांचा मेळ घालण्याच्या भरीस न पडतां फक्त सांख्यशास्त्रांतील चोवीस तत्त्वांचाच ब्रह्मवृक्ष तेथे वणिला आहे (म.भा. अश्व. ३५.२२.२३, व गीतार. प्र. ८ पृ. १७६ पहा) परंतु गीतेत तसे न करितां दृश्यसृष्टिरूप वृक्ष या नात्याने परमेश्वराचें जें वर्णन वेदांत आढळून येते, ते आणि सांख्यशास्त्रोक्त प्रकृतीच्या पसा- ज्याचे किंवा ब्रह्मांडवृक्षाचे वर्णन यांची या दोन श्लोकांत जोड घातलेली आहे. मोक्षप्राप्ती होण्यास त्रिगुणात्मक व ऊध्यमूल वृक्षाच्या या पसा- ज्यांतून मक्त झाले पाहिजे. पण हा वृक्ष एवढा अवाढव्य आहे. की, याला कोठून सुरुवात झाली हैहि कळत नाही. म्हणून या जगडव्याळ वृक्षाचा नाश करून त्याच्या बुडाशी असणारे अमृततत्व ओळखण्यास मार्ग कोणता ते सांगतात-] (३) परंतु ( पर जसे वर्णन केले) त्याप्रमाणे इहलोकी याचे स्वरूप