पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अघश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके ॥२॥ , पालटणारे असल्यामुळे त्याला "उद्यापर्यंत न टिकणारे" असे म्हणतां येईल खरे; पण ही दृष्टि येथे अभिप्रेत नाही, हे अव्यय' म्हणजे कधीहि ज्याचा व्यय होत नाही' या विशेषणावरून स्पष्ट होते. पिंपळ या वृक्षासच आरंभी अश्वस्थ म्हणत असून कठोपनिषदांत (६.१)- ऊर्ध्वमूलोऽवाशाख एषोऽश्वस्थः सनातनः। तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते ॥ असा जो ब्रह्ममय अमृत अश्वस्थवृक्ष सांगितला आहे तोहि हाच होय; व भगवद्गीतेतील वर्णन कठोपनिषदांतील वर्णनावरूनच घेतलेले आहे. हे" ऊध्र्वमूलमधःशाखं" या पदसादृश्यावरूनच व्यक्त होते परमेश्वर स्वर्गात असून त्यापासून निघालेला जगवृक्ष खाली म्हणजे मनुष्य- लोकी आलेला असल्यामुळे या वृक्षाचे मूळ म्हणजे परमेश्वर वर आणि स्या वृक्षाच्या अनेक शाखा म्हणजे जगाचा पसारा साली फुटलेला असल्याबद्दल वर्णन केले आहे. परंतु वडाच्या झाडाच्या पारंव्याहि वरून खाली वाढत जात असल्यामुळे हा संसारवृक्ष वटवृक्ष असावा, पिंपळ नव्हे, अशी दुसरी कल्पनाहि प्राचीन धर्मग्रंथांतून आढळून येत्ये. उदा. अश्वस्थवृक्ष आदित्याचा आणि “ न्यग्रोधो वारुणो वृक्ष:"-न्यग्रोध म्हणजे खाली (न्य ) वाढणारा (रोध) वटवृक्ष हा वरुणाचा वृक्ष-असें वर्णन असून (गोभिलगृह्य. ४. ७. २४). मार्कंडेय ऋषींनी प्रलयकाली बालरूपी परमेश्वर (त्या प्रलयकालीहि नाश न पावणाच्या अतएव ) अव्यय अशा एका न्यग्रोधाच्या म्ह० वटवृक्षाच्या खांदीवर पाहिला असें महाभारतांत वर्णन आहे (म. भा. वन. १८८.९१). तसेच छांदोग्योप- निषदांत अव्यक्त परमेश्वरापासून अवाढव्य दृश्यं जग कसे निर्माण होते हे दाखविण्यास जो दृष्टान्त घेतला आहे तोहि न्यग्रोधाच्या बीमाचाच आहे (छां. ६.१२.१). श्वेताश्वतरोपनिषदांतहि विश्ववृक्षाचे वर्णन