पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३४. २४॥ उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नैगते ॥ २३ ॥ समदुःखसुखः स्वस्थः समलोधाश्म कांचनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिंदात्मसंस्तुतिः ॥ २४ ॥ मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५ ॥ प्राप्त झाली तरी त्यांचा जो द्वेष करीत नाही, आणि प्राप्त न झाली तरी त्यांची आकांक्षा ठेवीत नाही; (२३) (कर्माबद्दल ) जो उदासीना- सारखा राहणारा; (सस्व, रज व नम हे) गुण ज्याला चाळवू शकत नाहीत; गुण (आपापले) काम करीत आहेत एवढेच मानुन जो स्थिर रहातो, हलत नाही म्हणजे विकार पावत माही; (२४) ज्याला सुख दुःख सारखेच; जो स्वस्थ इ. आपल्या ठिकाणींच स्थिर झाला; माती, दगड व सोने ही ज्याला सारखोंच, प्रिय व अनिय, निंदा व आपली स्तुति हैं. ज्याला समसमान; सदा धैर्याने युक्त; (२५) ज्याला व शत्रुपक्ष तुल्य म्हणजे एकसारखे; आणि (प्रकृति सर्व करित्ये असे समजल्यामुळे ) ज्याचे सर्व (काम्य) उद्योग सुटले, त्या पुरुषास गुणातीत असे म्हणतात. [त्रिगुणातीत पुरुषाची लक्षणे व आचार कसा असतो या दोन प्रश्नांचे हे उत्तर झाले. ही लक्षणे आणि दुपन्या अध्यायांतील स्थित- प्रज्ञ (२.५५.७२) व बाराव्या अध्यायांतील भक्तिमान पुरुष (१२.. १३-२०) यांची लक्षणे एकसारखीच आहेत. किंबहुना सारंभ- परित्यागी,' तुल्यनिंदास्तुतिः,' उदासीनः' वगैरे काही विशेषणेहि दोन्ही किंवा तिन्ही ठिकाणी एकच आहेत. यावरून मागील अध्यायांत (१३.२४, २५) सांगितलेल्या चार मार्गापैकी कोणताहि मार्ग स्वीका- रिला तरी सिद्धी पावलेल्या पुरुषाचा आचार लक्षणे सर्व मागांत एकच