पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ श्रीमद्भगवद्गीता. 88 मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥२६॥ ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च ॥ २७ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ।। असतात हे उघड होते. तथापि मागे तिसऱ्या, चवथ्या, पांचव्या वगरे अध्यायांतून निष्काम कम कोणालाच चुकली नाहीत असा तो एक ठाम सिद्धान्त केला तो अबाधित असल्यामुळे हेस्थितप्रद भग. वक्त किंवा त्रिगुणातीत सर्व कर्मयोगमार्गातील आहेत हे लक्षांत ठविले पाहिजे. सर्वारंभपरित्यागी' याचा अर्थ काय है१२. १९ या श्लोकाच्या टीत सांगितले आहे ते पहा, सिद्धावस्थेत पोचलेल्या पुरु. पाची ही वर्णने स्वतंत्र आहेत असे कलपून संन्यासमार्गातील टीकाकार आपलाच संप्रदाय गीतेत प्रतिपाद्य आहे असें वर्णन करीत असतात. पण तो अर्थ पूर्वापार संदर्भाच्या विरुद्ध आहे, खरा नव्हे, हे गीता- रहस्यांतील ११ व्या व १२ व्या प्रकरणांत (पृ. ३२२ व ३७१) आम्ही सविस्तर प्रतिपादन केले आहे. असो अर्जुनाच्या दोन प्रश्नांची उत्तरे झाली. आता हे पुरुष तीन गुणांपलीकडे कसे जातात याचे उत्तर सांगतात- (२६) आणि जो (सर्व कर्भ मलाच अर्पण करण्याच्या) अव्यभिचार म्हणजे एकनिष्ठ भक्तियोगाने माझी सेवा करितो तो या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मभूतावस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होतो. त्रिगुणातीतावस्था सांख्यमार्गातली असता तीच कर्मपर भक्ति- योगाने कशी प्राप्त होत्ये अशी शंका या श्लोकाबर येण्याचा संभव आहे, म्हणून भगवान् असे सांगतात की-] (२७) कारण, मीच अमृत व अव्यय ब्रह्माचें, शाश्वत धर्माचे व एकान्तिक म्हणजे परमावधीच्या अत्यंत सुखाचे अखेरचे स्थान आहे.