पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० श्रीमद्भगवद्गीता. गुणानेतानात्य त्रीन्देही देहसमुद्भवान् । जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २० ॥ अर्जुन उवाच । F कैलिगैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो। किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥२१॥ श्रीभगवानुवाच । प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव । न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥ २२ ॥ (२०) देहधारी मनुष्य देहोत्पत्तीस कारण झालेल्या या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यु, जरा बांगा दुःखानी विमुक्त होरसाता अमृ- ताचा झ० मोक्षाचा अनुभव घेतो. । [वेदान्तांत ज्याला माया हातात त्यालाच सांख्य त्रिगुणात्मक प्रकृती असे म्हणत असल्यामुळे त्रिगुणातीत होण म्हणजे मायेंतून सुटून परब्रह्म ओळखणे होय (गी १.५५); व हिलाच ब्राह्मी अवस्था म्हणतात (गी २ ७२, १८.५३). त्रिगुणातीताचें हे अध्यात्मशास्त्रां. तील लक्षण ऐकून त्याची अधिक माहिती करून घेण्याची अर्जुनास इच्छा होऊन मार्गे दुसन्या अध्यायांत स्थितप्रज्ञाबद्दल जसा त्याने प्रश्न केला होता (२,५३), तद्वत् आतांहि तो विचारितो की--] अर्जुन महणाला-~(२१) प्रभो ! कोणत्या लक्षणांनी या तीन गुणांच्या पलीकडे जातो (म्हणावयाचा)? त्या (त्रिगुणातीताचा) आचार कसा आणि तो या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो? (हे मला सांगा). श्रीभगवान् म्हणाले-(२२) हे पांडवा ! प्रकाश, प्रवृत्ति आणि गोह (म्हणजे अनुक्रमें सत्व, रज व तम या गुणांनी कार्य किंवा फलें)