पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५॥ तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥६॥ रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् । तन्निबध्नाति कौतेय कर्मसंगेन देहिनम् ॥ ७ ॥ तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८॥ सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥ ५ ॥ (५) है महाबाहो ! प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्त्व, रज व सम हे गुण देहांत रहाणाच्या अव्ययास म्हणजे निर्विकार आत्म्यास देहांत बांधून टाकितात, (६) पैकी निर्मल असल्यामुळे प्रकाश पाडणारा व निर्दोष असा जो सत्वगुण तो हे निष्पाप अर्जुना ! सुख आणि ज्ञान यांच्या संगान (प्राण्यास) बांधून टाकितो. (७) रजोगुणाचा स्वभाव रंग- विण्याचा असून तृष्णा व आसक्ति हैं। यापासून उत्पन्न होतात असे समज. हे कौतैया! तो प्राण्याला कर्मे करण्याच्या (प्रवृत्तिरूप) संगाने बांधून टाकितो. (4) पण तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होऊन सर्व प्राण्यांना मोह घालणारा आहे असे समज. हे भारता तो प्रमाद, आळस व निद्रा यांनी (त्यास) बांधून टाकितो. (९) सत्वगुण सुखाचे ठायीं; व रजोगुण कर्माचे ठायीं आसक्ति उत्पन्न करितो. परंतु हे भारता ! तमो- गुण हा ज्ञानावर पांघरूण घालून प्रमाद म्हणजे कर्तव्यमूढता किंवा कर्त- व्याचा विसर याच ठायीं आसक्ति उत्पन्न करितो. । [सस्व, रज व तम या तीन गुणांची ही पृथक लक्षणे सांगितली. पण हे गुण पृथक् पृथक् कधीच रहात नसून नेहमी तिन्ही एकत्र