पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १४. २७५ इदं शानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः। सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥२॥ $$ मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३ ॥ सर्वयोनिपु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः। तासां ब्रह्म महद्योनिरहं वीजप्रदः पिता ॥ ४ ॥ विज्ञान जास्त खुलासेवार आता तुला पुनः सांगतों अशी या अध्यायास भगवंतांनी सुरुवात केली आहे. सांख्यशास्त्रदृष्टया या विषयाचे सविस्तर निरूपण गीतारहत्याच्या आठव्या प्रकरणांत केले आहे ते पहा. निगणाच्या पसायाचे हैं वर्णन अनुगीतेत व मनुस्मृतीच्या बाराव्या अध्यायांतहि आलेले आहे. श्रीभगवान् ह्मणाले-(१) आणखी पुनः ज्ञानांतले उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना या लोकांतून परम सिद्धि प्राप्त झाली आहे. (२) या ज्ञानाचा आश्रय करून माझ्याशी एकरूपता पावलेले, सृष्टीच्या उपत्तिकालीहि जन्मत नाहीत आणि प्रलयकालीहि व्यथा पावत नाहीत; (ह्मणजे जन्ममरणापासून अजिबात मुक्त होतात.). ही प्रस्तावना झालो. आतां प्रकृति हे माझेंच स्वरूप आहे असें प्रथम सांगून सांख्यांचे द्वैत काढून टाकल्पावर सत्व, रज व तम या प्रकृतीच्या तीन गुणांमुळे सृष्टीतील नानाविध व्यक्त पदार्थ कसे निर्माण होतात याचें वेदान्तशास्त्राशी विरोध न आणितां निरूपण । करितात-] (३) हे भारता ! महब्रह्म म्हणजे प्रकृति ही माझीच योनि असून मी तिच्या ठिकाणी गर्भ ठविताः नंतर त्यापासन सर्व भूते उत्पन्न हो लागतात. (१) (पशुपक्ष्यादि) सर्व योनीत ज्या ज्या मूर्ति जन्मास येतात त्यांची हे कौतया ! महत् ब्रह्म ही योनि असून मी बीजदाता पिता आहे.