पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १४. २७७ रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत । रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥ सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते । ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११ ॥ लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणामशमः स्पृहा । रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२ ॥ अप्रकाशोऽप्रवृतिश्च प्रमादो मोह एव च । तमम्यतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन ।। १३ ॥ असतात. उदाहरणार्थ कोणतेहि चांगले काम करणे हे जरी सरवाचें लक्षण असले तरी चांगले काम करण्याची प्रवृत्ति होणे हा धर्म रजाचा असल्यामुळे सात्विक स्वभावांतहि थोडी तरी रजाची मिसळ नेह- मीच असली पाहिजे. यासाठीच तमाचं मिथुन म्हणजे जोडी सत्व, सत्त्वाचे मिथुन रज, असे अनुगीतेत या गुणांचे मिथुनात्मक वर्णन असून (म. भा. अश्व, ३६), त्यांच्या अन्योन्य म्हणजे परसरांच्या आश्रयाने अगर झटापटीने सृष्टीतील सर्व पदार्थ होतात, असे म्हटले आहे. सां. का. १२ व गातार. पृ. १५५ व १५६ पहा. हेच तत्व आतां प्रथम सांगून नंतर सात्विक, राजस व तामस स्वभावांची लक्षणे सांगतात- (10) रज व तम यांचा पाडाव करून सत्व (वरचढ) होते (तेव्हां त्याला सारिखक म्हणावयाचे); व त्याचप्रमाणे सत्व व तम यांचा पाडाव करून रज, आणि सत्व व रज यांचा पाडाव करून तम (वरचढ होत असते). (११) या देहांत सर्व द्वारांत ( इंद्रियांत ) प्रकाश म्हणजे निर्मल ज्ञान जेव्हां उत्पन्न होते तेव्हां सत्वगुण वाढला आहे असे समजावें. (१२) हे भरतश्रेष्टा ! रजोगुण वाढला म्हणजे लोभ, कर्माकडे प्रवृत्ति व त्यांचा आरंभ, अतृप्ति व इच्छा ही उत्पन होतात. (१३) आणि हे कुरुनंदना !