पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ श्रीमद्भगवद्गीता. चतुर्दशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् । यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ।।१।। चक्षूनेच दिसणारे (गी. ११.८), हा नऊ, अकरा व तेरा या अध्या- यांतील ज्ञान विज्ञानविरूपणांतला भेद लक्षात ठेवण्यासारखा आहे. ] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाईलेल्या ह्मणून सांगितलेल्या उदनिषदांत महाविद्यान्तर्गत योग-हाणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जन यांच्या संवादांतील प्रकृतिपुरुषविवेक हा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नांवाचा तेरावा अध्याय समाप्त झाला. अध्याय चवदावा. [तेराव्या अध्यायांत क्षेत्रक्षेत्रज्ञविचार एकदा वेदान्त दृष्टया व एकदा सांख्यदृष्टया सांगितला, आणि त्यांत सर्व कर्तृत्व प्रकृतीचे असून पुरुष म्ह० क्षेत्रज्ञ उदासीन असतो असे प्रतिपादन केले. पण प्रकृतीचे हे कर्तृत्व कसे चालू रहाते याचे विवेचन अद्याप झाले नाही. म्हणून एकाच प्रकृतीपासून भानाविध सष्टि, विशेषतः सजीव सृष्टि, कशी उत्पन्न होते असें या अध्यायांत निरूपण करितात. केवळ मानवी सृष्टीचाच विचार केला तर हा विषय क्षेत्राबद्दलचा म्हणजे शरीराचा असल्यामुळे त्याचा क्षेत्रक्षेत्रशविचारांत समावेश होऊ शकतो. पण स्थावर साष्टिसुद्धा त्रिगुणात्मक प्रकृतीचाच पसारा असल्यामुळे प्रकृतीच्या गुणभेदाचे हे विवेचन क्षराक्षरविचाराचाहि भाग होऊ शकते. म्हणून क्षेत्रक्षेत्रज्ञविचार हे संकुचित नांव सोडून देऊन सातव्या अध्यायांत जे ज्ञानविज्ञान सांगण्यास सुरुवात केली तेच ज्ञान-