पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २७३ क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमंतरं ज्ञानचक्षुपा। भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥ (३४) याप्रमाणे ज्ञानचक्षूनं म्हणजे ज्ञान रूप डोळ्याने, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांमधील भेद आणि सर्व भूतांच्या (मुलभूत ) प्रकृतीचा मोक्ष ज्यांनी जाणिला ते परब्रह्माप्रत जातात. - [एकंदर सर्व प्रकरणाचा हा उपसंहार आहे. 'भूतप्रकृतिमोक्ष' या शब्दाचा अर्थ आम्ही सांख्यशास्त्राच्या सिदान्ताप्रमाणे केला आहे. मोक्ष मिळणे किंवा न मिळणे या अवस्था आत्म्याच्या नाहीत; कारण तो नेहमीच अकर्ता व असंग आहे. परंतु प्रकृतिगुणांच्या संगाने तो आपल्या छायीं कर्तृत्वाचा आरोप करीत असल्यामुळे, त्याचे हे अज्ञान नाहीसे । झाले म्हणजे त्याशी संयुक्त असलेली प्रकृति सुटते, म्हणजे तिचाच मोक्ष . होतो, व नंतर ती पुरुषापुढे नाचावयाची बंद होते, असा सांख्यांचा सिद्धान्त आहे. म्हणून बंध व मोक्ष या दोन्ही अवस्था तात्त्विकदृष्टया , प्रकृतीच्याच आहेत असें सांख्य प्रतिपादन करीत असतात (सांख्यका- रिका ६२ आणि गीतारहस्य प्र. ७ पृ. १६२ पहा ). या सांख्यसिद्धा- ताला अनुसरूनच 'प्रकृतीचा मोक्ष' हे शब्द या श्लोकांत आले आहेत असे आम्हांस वाटते. परंतु कित्येक "भूतेभ्यः प्रकृतेश्च मोक्षः" म्हणजे पंचमहाभूते व प्रकृति यांच्यापासून अर्थात् मायात्मक कर्मापासून आत्म्याचा मोक्ष होतो असाहि या शब्दाचा अर्थ लावितात. असो; हा क्षेत्रक्षेत्रज्ञविवेक ज्ञानचक्षुने कळगारा (गी. १३.३४), तर नवव्या अध्यायांतील राजविद्या प्रत्यक्ष ह्मणजे चर्मचक्षुनें कळणारी (मी. ९.२), आणि विश्वरूपदर्शन परम भगवद्भक्तासहि केवळ दिद गी. र. १७