पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. 56 प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः। यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ २९॥ यदा भृतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥३०॥ ६ अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौतय न करोति न लिप्यते ॥ ३१ ॥ यथा सर्वगतं सौम्यादाकाशं नोपलिप्यते। सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥३२॥ यथा प्रकाशयत्येकः कृत्सं लोकमिमं रविः । क्षेत्र क्षेत्री तथा कृत्र प्रकाशयति भारत ॥ ३३ ॥ (२९) (सर्व) कर्मे सर्व प्रकारे केवळ प्रकृतीकडूनच केली जातात, आणि आत्मा हा अकर्ता म्हणजे काहीएक न करणारा आहे. हे ज्यान जाणिले स्याने (खरे तस्व) ओळखिलें म्हणावयाचे. (३०) जेम्हां सर्व भूतांतील पृथक्स्व म्हणजे नानात्व एकत्वाने (दिसू लागेल), आणि या (एकत्वा.) पासूनच (सर्व) विस्तार ( झाला आहे) असे दिसूं लागेल तेव्हां ब्रह्म प्राप्त होते. • [आस्मा निर्गुण, अलिस व अक्रिय कसा ते आता सांगतात- (३१) अनादि व निर्गुण असल्यामुळे हा अव्यय परमात्मा शरीरांत राहूनहि हे कौंतेया ! काही करीत नाही, व त्याला (कोणत्याहि कर्माचा) लेप म्हणजे बंध लागत नाही. (३२) ज्याप्रमाणे आकाश चोहोकडे भरले असून सूक्ष्म असल्याने त्याला (कशाचाहि) लेप लागत नाही, स्याप्रमाणे आस्मा देहांत सर्वत्र रहात असून त्याला (कशा- चाहि) लेप लागत नाही. (३३) ज्याप्रमाणे एकटा सूर्य हे सर्व जग प्रकाशित करितो, त्याप्रमाणे हे भारता ! क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला म्हणजे शरीराला प्रकाशित करीत असतो.