पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २६५ 3$ शेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वाऽमृतमश्नुते। [क्षेत्रक्षेत्रज्ञाचे ज्ञान म्हणजे प्रकृतिपुरुषांच्या विवेकांचे ज्ञान असे सांख्यांचे मत आहे, व ते याच अध्यायांत पुढे सांगितले आहे (१३. १९-२३, १४.१८); तसेंच "अविभक्त बिभत्तेषु' अर्सेहि ज्ञानाच्या स्वरूपाचें व्यापक लक्षण अठराव्या अध्यायांत (१८.२०) दिले आहे पण क्षेत्रक्षेत्रज्ञज्ञान म्हणजे अमुक अमुक गोष्टी अमक्या प्रकारच्या आ- हेत असें केवळ बुद्धीने जाणणे एवढाच अर्थ मोक्षशास्त्रांत विवक्षित नसतो. त्या ज्ञानाचा देहस्वभावावर साम्यबुद्धिरूप परिणाम घडला असला पाहिजे, एरवी ते ज्ञान अपुरे किंवा कच्चे होय, असा अध्या- स्मशास्त्राचा सिद्धान्त आहे. म्हणून ज्ञान म्हणजे बुद्धीला अमुक अमुक कळणे असे न सांगतां मान व दंभ सुटणे, अहिंसा, अनासक्ति, समबुद्धि इत्यादि वरील पांच श्लोकांत सांगितलेले बीस गण मनुष्याचे अंगांत दृष्टीस पडू लागले म्हणजे त्याला ज्ञान म्हणावे अशी ज्ञानाची म्याच्या वरील श्लोकांत केली आहे (गीतार. प्र. ५ पृ. २४५ व ३४६ पहा). दहाव्या श्लोकांत "विविक्त जागी रहाणे व चव्हाठा न आवडणे" असे जे ज्ञानाचे एक लक्षण दिले आहे त्यावरून संन्या. समार्गच गीतेस अभिप्रेत आहे असे दाखविण्याचा कित्येकांनी प्रयत्न केला आहे. पण हे मत खरे नसून असा अर्थ करणे युक्तहि नाहीं हे आम्ही पूर्वीच सांगितले आहे (गी. १२.१९ वरील टीप व गीतार. पृ. २८. पहा), 'ज्ञान' म्हणजे काय एवढ्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे; व ते ज्ञान म्हणजे बायकामुले, घरदार किंवा लोकांचा चव्हाठा या ठिकाणी अनासक्ति होय, याबद्दल कोणताच वाद नाही. हे ज्ञान झाल्यावर याच अनासक्त बुद्धीने बायकामुलांत किंवा जगांत राहून सर्वभूतहितार्थ जगाचे व्यवहार करावे की नाही हा यापुढला प्रश्न आहे आणि त्याचा निकाल केवळ ज्ञानाच्या व्याख्येवरूनच करणे योग्य नाही. कारण, गीतेतच भगवंतांनी अनेक ठिकाणी ज्ञानी पुरु- - - - - - -