पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥ इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥ असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु । नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥ मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी। विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥ अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् । एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ ११ ॥ हे आरंभीच सांगितले आहे. म्हणून क्षेत्रज्ञाचे जे ज्ञान तेच परमेश्वराचें ज्ञान होय, व याचेच स्वरूप पुढील श्लोकांतून वर्णिले आहे. भलताच निराळा विषय मध्ये घुसडलेला नाही. ] (७) मान नसणे, दंभ नसणे, अहिंसा, क्षमा, सरळपणा, गुरुसेवा, शुचिर्भूतपणा, स्थैर्य, मनोनिग्रह, (८) इंद्रियांच्या विषयांचे ठायी विरक्ति, तसेंच अहंकार नसणे, आणि जन्म, मृत्यु, जरा, ज्याधि व दुःख (हे आप ल्यामागे लागलेले) दोष आहेत अशी बुद्धि असण; (९) (कर्माचे ठायीं) अनासक्ति, बायकामुले व धर इत्यादिकांत लंपट न होणे, इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची एकसारखी वृत्ति असणे, (10) आणि माझ्या ठायीं अनन्यभावाने न ढळणारी भक्तिः 'विविक्त' म्हणजे निवडक किंवा एकान्त जागी रहाणे, सामान्य जनांचा चव्हाठा न आव. डणे, (११) अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धि होणे, व तत्वज्ञानाच्या सिद्धान्तांचे परिशीलन, यांस ज्ञान म्हटले आहे. याखेरीज में दसरें तें अज्ञान होय.