पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १२. $$ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥९॥ अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव। मदर्थमपि कर्माणि कुर्वसिद्धिमवाप्स्यसि ॥१०॥ अथैतद्प्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः। सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥1॥ की, अव्यक्तोपासना कष्टमय असली तरी तीहि मोक्षप्रदच आहे, आणि भक्तिमार्ग झाला तरी त्यांत कमैं न सोडितां तीच ईश्वरार्पण करून भवश्य करावयाची आहेत है भक्तिमार्गीयांनी लक्षात ठेवावें व याच देतूने सहाव्या लोकांत " माझेच ठायीं सर्व कर्माचा संन्यास करून" हे शब्द घातलेले आहेत, मकियोगांतील कमें स्वरूपतः सोडावयाची नाहीत तर परमेश्वराचे ठिकाणी ती म्हणजे त्यांची फलें अर्पण करावयाची, असा याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि जो भाकिमान पुरष मला प्रिय म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या अखेर सांगितला आहे सोहि याच म्हणजे निष्काम कर्मयोगमार्गातला समजावयाचा, स्वरू- पतः कर्मसंन्यासी नव्हे, हेहि यावरून उघड होते. असो, भक्तिमार्गाची सुलभता व श्रेष्ठत्व याप्रमाणे दाखवून आतां परमेश्वराच्या ठायीं या प्रकारची माक्ति जहण्यास उपाय अथवा साधनें कोणती ते सांगून मां- तील तारतम्याचाहि अखेर खुलासा करितात-1 (९) आतां (याप्रमाणे) माझ्या ठायी चांगल्या प्रकारे चित्त स्थिर ठेवणे तुला होत नसेल तर हे धनंजया ! अभ्यासाच्या सहाय्याने पुन:- पुनः प्रयत्न करून माझी प्राप्ति करून घेण्याची उमेद राख. (१०) अभ्यास करण्यासहि तूं असमर्थ असशील तर मदर्थ म्हणजे मत्माप्स्यर्थ (शासांत सांगितलेली ज्ञान-ध्यान-भजन-पूजनादि) कमें करीत जा; मदर्थ (ही) कमे केल्यानेहि तूं सिद्धि पावशील. (11) पण हे कर्म करण्यासहि जर हूं