पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० श्रीमद्भगवद्गीता. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्यानं विशिष्यते। ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनंतरम् ॥१२॥ असमर्थ असशील तर मद्योग म्ह० मदर्पणपूर्वक जो योग, अर्थात् कर्मयोग स्याचा आश्रय करून यतारमा म्ह० हळूहळू चित्त आंवरीत होत्साता तदनंतर (अखेर) सर्व कर्माच्या फलाचा त्याग कर. (१२) कारण, अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक चांगले, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक योग्यतेचें, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग (श्रेष्ठ), आणि (या कर्मफलाच्या), स्यागा- पासून पुढे लगेच शान्ति (प्राप्त) होत्ये. । [हे श्लोक कर्मयोगदृष्टया अत्यंत महत्वाचे आहेत; व त्यांत भक्तियुक्त कर्मयोग सिद्ध होण्यास अभ्यास, ज्ञानभजनादि कमैं घगरे साधनें सांगून साधनांच्या तारतम्यविचारान्ती अखेर म्हणजे १२ व्या श्लोकात कर्म- फलत्यागाचे म्हणजे निष्काम कर्मयोगाचे श्रेष्टस्व वर्णिले आहे. निष्काम कर्मयोगाचे हे श्रेष्ठत्व येथेच वर्णिले आहे असे नाही. तर पूर्वी तिप्लया (३..), पांचव्या (५.२) व सहाव्या (६.४६) अध्यायांत हाच अर्थ स्पष्टरीत्या वर्णिला असून त्याप्रमाणे फलस्यागरूप कर्मयोगाचे आचरण करण्यासहि ठिकठिकाणी अर्जुनास उपदेश केला आहे (गीतार. पृ. ३०४, ३०५ पहा). पण गीताधर्माहून ज्यांचा संप्रदाय भिक्ष आहे त्यांना ही गोष्ट विरुद्ध पडत्ये, म्हणून त्यांनी वरील श्लोकांचे व विशेषतः १२ व्या श्लोकांतील पदांचे अर्थ बदलण्याचा प्रयत्न केला आहे. निम्बळ ज्ञानमार्गी म्हणजे सांख्य टीकाकारांस ज्ञानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ ठरविलेला आवडत नाही. म्हणून एक तर ज्ञान शब्दाने 'पुस्तकी ज्ञान' ध्यावे किंवा कर्मफलस्यागाची ही प्रशंसा अर्थवादात्मक म्हणजे पोकळ समजावी, असे त्यांनी म्हटले आहे. स्याचप्रमाणे पातंजलयोगमार्गीयांस अभ्यासापेक्षा कर्मफलत्याग अधिक ठरविलेला खपत नाही. आणि 'नाया अमिताin rem अमीनी iixxtam