पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० श्रीमद्भगवद्गीता. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनंतवीर्यामितविक्रमस्त्वं सर्व समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥ सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४॥ यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु । एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् । ४२ ॥ पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुगरीयान् । नत्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः।।४३ (४०) तुम्हांला पुन नमस्कार आणि पाठीमागून नमस्कार, सर्वच बाजूंनी हे सर्वात्मका ! सुम्हाला नमस्कार असो. तुमचे वीर्य अनंत व सुमचा पराक्रम अतुल असून सर्वांना पुरे पडत असल्यामुळे तुम्हीच 'सर्व' आहां. । [पुदन नमस्कार, पाठीमागून नमस्कार हे शब्द परमेश्वराचे सर्व- व्यापिस्व दाखवितात. उपनिषदांत "ब्रह्मवेदं अमृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणतनोत्तरेण । अधश्चोर्ध्वं च प्रसृतं अहौंवेदं विश्वमिदं वरिष्ठम् " (मुं. २.२.११; छो. ७.२५) असें जें ब्रह्माचे वर्णन येते त्याला अनुसरून भक्तिमार्गाल हो नमनामक स्तुति आहे. ] (११) तुमचा हा महिमा न ओळखितो मित्र समजून ‘रे कृष्णा,' 'रे यादवा' सखे' असें चुकीने किंवा सलगीने जे काही मी अमर्याद बोललो असेन, (४२) आणि आहारविहारांत किंवा निजण्याबसण्यांत, हे अच्युता! एकट्याला किंवा चारचौघांत मी जो काही तुमचा थट्टेने अपमान केला असेल त्याची आपण मला क्षमा करावी असें तुम्हां अप्रमे यांजवळ माझे मागण आहे. (४३) तुम्हीच या चराचर जगताचे पिता असून पूज्य व गुरूचे गुरू आहां? सर्व त्रैलोक्यांत तुमच्या बरोबरीचा