पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता. भाषान्तर व टीपा-अध्याय ११. २३९ त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । वेत्ताऽसि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८ ॥ वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च । नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥ येईल. सत् व असत् यापलीकडले जे तत्त्व तेच अक्षर ब्रह्म म्हणून गीता १३. १२ यांत 'मी सत् नाही व अपत् नाही' असे स्वच्छ वर्णन आहे. 'अक्षर' शब्द गीतेत कधी प्रकृतीस तर कधी पर. ब्रह्मास लाविलेला असतो. गोता ९. १९, १३. १२ व १५.१६ वरील टीका पहा.] (३८) तुम्ही आदिदेव, (तुम्ही) पुरातन पुरुष; तुम्हीच या जग. ताचे परम आधार; तुम्ही ज्ञाते व ज्ञेय, तुम्ही श्रेष्ठ स्थान, आणि तुम्हीच हे अनंतरूपा! (हे) विश्व विस्तारिलें किंवा व्यापिले आहे. (३९) वाय, यम, अग्नि, वरुण, चंद्र, प्रजापति म्हणजे ब्रह्मदेव, आणि पणजोबाहि तुम्हीच आहा. तुम्हाला हजार वेळां नमस्कार असो ! आणि फिरून आणखीहि तुम्हांलाच नमस्कार असो ! [ब्रह्मदेवापासून मरीच्यादि सात मानसपुत्र निर्माण होऊन मरी- च्यापासून कश्यप व कश्यपापासून सर्व प्रजा झाली आहे (म. भा. आदि. ६५.११); म्हणून या मरीच्यादिकांसच प्रजापति असे म्हण- तात (शां. ३४०.६५). यामुळे प्रजापति शब्दाचा कश्यपादि प्रजा- पति असा कोणी अर्थ करितात. पण प्रजापति हैं पद येथे एकवचनी असल्यामुळे प्रजापति म्हणजे ब्रह्मदेव हा अर्थ अधिक ग्राह्य दिसतो. शिवाय ब्रह्मदेव हा मरीच्यादिकांचा पिता म्हणजे सर्वांचा पितामह (आजा) असल्यामुळे पुढे 'प्रपितामह' (पणजोबा) हे पदहि ओघानेच प्राप्त होऊन त्याची सार्थकता व्यक्त होत्ये. ]