पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १०. २९ अर्जुन उवाच । 5 परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् । पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ।। १२ ।। आहुस्त्वामृषयः सबै देवर्षिनारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥१३॥ सर्वमेतद्दतं मन्ये यन्मां वदसि केशव । न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥ स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५॥ वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । याभिर्विभूतिभिलाकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥१६॥ कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिंतयन् । केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ।। अर्जुन म्हणाला-(१२) तुम्हीच परम ब्रह्म, श्रेष्ठ स्थान व परम पवित्र वस्तु (आहां); दिव्य व शाश्वत पुरुष, आदिदेव, अजन्मा, सर्वविभु म्हणजे सर्व- व्यापी असें (१३) तुम्हांला सर्व ऋषि, तसंच देवर्षि नारद, असित, देवल आणि व्यासहि म्हणतात; आणि स्वतः तुम्हीहि मला तेच सांगतो. (१४) हे केशवा ! तुम्ही मला जे हे सांगता ते सर्व मी सत्य मानितो. भगवान् ! तुमची व्यक्ति म्हणजे तुमचे मूळ देवांना माहीत नाही आणि दैत्यांना माहीत नाही. (१५) हे सर्व भूते उत्पन्न करणान्या भूतेशा! देवदेवा जगत्पते! तुम्ही हे पुरुषोत्तमा ! स्वतःच आपण आपल्याला जाणिता, (१६) म्हणून तुमच्या ज्या दिव्य विभूति आहेत, ज्या विभूतींनी हे सर्व लोक व्यापून तुम्ही राहिला आहां, त्या आपणच मला (कृपा करून) पूर्णपणे सांगा. (७) हे योगिन् ! सदा तुमचे चिंतन करीत असता