पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ श्रीमद्भगवद्गीता. भश्चित्ता मद्भगतप्राणा बोधयन्तः परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥९॥ तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । दादामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥१०॥ तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो शानदीपेन भास्वता ॥ ११ ॥ युक्त होत्साते मला भजत असतात. (९) माझ्या ठिकाणी चित्त लावून, व माझ्या ठायीं जीवप्राण ठेवून, एकमेकाला बोध करीत व माझ्या कथा सांगत, (त्यांतच) नेहमी संतुष्ट व रममाण असतात. (१०) याप्रमाणे नेहमी युक्त म्हणजे समाधानाने राहून प्रीतिर्वक मला भजणाच्या लोकांस ते मला येऊन पोचतील असा (समरव) बुद्धीचा योग मीच देत असतो (११) आणि त्यांवर अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या आत्मभावांत म्हणजे अंतःकरणांत शिरून तेजस्वी ज्ञानदीपाने (त्यांच्या मनांत) अज्ञानापासून उत्पन्न झालेल्पा अंधकाराचा नाश करितों. । [सातच्या अध्यायांत निरनिराळ्या देवतांवरील श्रद्धा देखील परमे- श्वरच देतो असे जे म्हटले आहे (७.२१) त्याप्रमाणेच आतांहि भक्ति- मार्गास लागलेल्या मनुष्याची समत्वबुद्धि वाढविण्याचे कामहि परमेश्वरच करितो असे घर दहाव्या श्लोकांत वर्णन असून, कर्मयोगाची एकदा जिज्ञासा झाल्यावर मनुष्य चरकांत घातल्याप्रमाणे पूर्ण सिद्धीकडे ओदिला जातो असे जे पूर्वी (गी. ६.४४) वर्णन आले आहे त्याशी मक्तिमार्गातील हा सिद्धान्त समानार्थक आहे ज्ञानदृष्टया म्हणजे कर्म- विपाकप्रक्रियेप्रमाणे हे कतृत्व आत्मस्वातंत्र्यामुळे प्राप्त होते असे म्हण. तात. पण आरमा तरी परमेश्वरच; म्हणून भक्तिमार्गात ही फले किंवा बुद्धि परमेश्वरच ज्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे देतो असें वर्णन येत असते (गी...२० व गीतार.प्र. ११ पृ. २२५ पहा). याप्रमाणे | भगवंतांनी भक्तिमार्गातील तत्व सांगितल्यावर-1