पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. विस्तरेणात्मनो योग विभूति व जनार्दन । भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८ ॥ श्रीभगवानुवाच । $ हंत ते कर्थ या दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यत. कुरुश्रेणु नास्त्यंतो विस्तरस्य मे ॥ १९॥ तुम्हांला म कसे अळस व ? आणि हे भगवान् ! कोणकोणत्या पदार्थामध्ये मी तुमचे चिंतन करावे ? (ते मला सांगा). (१८) हे जनार्दना ! आपली विभूवि व योग पुनः मला विस्ताराने सांगा; कारण, अमृततुल्य ( तुमचे भाषण) ऐषितां ऐकिता माझा तृप्ती होत नाही. । [विभूति आणि योग हे शब्द याच अध्यायाच्या सातच्या श्लोकांत आलेले असून त्यांचाच अर्जुनाने येथें अनुवाद केला आहे. 'योग' शब्दाचा अर्थ पूर्वी (गी ७. २५) दिला आहे तो पहा. भगवंताच्या विभूति अर्जुन विचारितो याचे कारण निरनिराळ्या विभूतींचं देवता म्हणून ध्यान करण्याकरितां मम्हे, तर सदर विभूतींत सर्वव्यापी परमेश्वराचीच भावना ठेवण्याकरितां होय, असें जें सतराव्या श्लोकांत म्हटले आहे ते लक्षात ठेविले पाहिजे. कारण, एकच परमेश्वर सर्व ठिकाणी आहे हे ओळखणे आणि परमेश्वराच्या निरनिराळ्या विभूति निरनिराळ्या देवता आहेत असे मानणे, यांत भक्तिमार्गदृष्टया महदंतर आहे हे भगवंतांनी पूर्वीच (गो. ७२०-२५, ९, २२-२८) सांगितले आहे.] श्रीभगवान् म्हणाले-(१९) बर; तर आतां ज्या माझ्या दिव्य विभूति आहेत त्यापैकी हे कुरुश्रेष्ठा! मुख्य मुख्य तुला सांगतों; कारण माझ्या विस्ताराला अंत नाही.