पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ९. FF अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥ मोघाशा मोधकर्माणो मोघशाना विचेतसः। राक्षसीमासुरीं चैव प्रकृति मोहिनीं श्रिताः ॥ १२ ॥ SS महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः। भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥ 'तत्त्वे एकाच ठिकाणी सांगण्यात येतात. गौतेतील पद्धत संवादात्मक असल्यामुळे एकच विषय प्रसंगानुसार थोडा एक ठिकाणी तर थोडा दुसन्या ठिकाणी सांगितला आहे. दहाव्या श्लोकांत जगद्विपरिवर्तते' अशी जी पदे आहेत, ती विवर्तवादास अनुलक्षुन आहेत अशी कोटी कित्येकांनी काढिलेली आहे. पण 'जगाची घडामोड चालली आहे' म्हणजे 'व्यक्ताचे अव्यक्त आणि पुनः अध्यक्ताचे व्यक्त होत असते' यापेक्षा 'विपरिवर्तते' पदाचा काही जास्त अर्ध होतो असे आम्हांस वाटत नाही, व शांकरभाष्यांतहि म्हटले नाही. कर्माने मनुष्य अवश कसा होतो याचे गीतारहस्याच्या ५० च्या प्रकरणांत विवेचन केले आहे ते पहा -- (११) सर्व भूतांचा मोठा ईश्वर असे जे माझे परम स्वरूप तें न जाणणारे मूढ लोक मनुष्य देह धारण केलेल्या मला (मनुष्यदेहधारी समजून ) अवमानितात. (१२) त्यांच्या आशा व्यर्थ, कम फुकट, ज्ञान वांझ, आणि चित्त भ्रष्ट असून त्यांनी मोहात्मक राक्षसी व आसूरी स्वभावाचा आश्रय केलेला असतो. आसुरी पुरुषाचे हे वर्णन झाले. आतां देवी स्वभावाचे वर्णन करितात- (१३) परंतु दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहिलेले महात्मे हे पार्था ! सर्व भूतांचे अव्यय आविस्थान जो भी त्या मला ओळखून अनन्यभाव