पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ श्रीमद्भगवद्गीता. $$ सर्वभूतानि कौतेय प्रकृति यान्ति मामिकाम् । कल्पक्षय पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥ प्रकृति स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः। भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥८॥ न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय। उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९॥ मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । हेतुनानेन कोतेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥

परमेश्वरास योगेश्वर (गी. १८.७५) असे म्हणतात. या योगसाम-

याने जगाची घडामोड कशी चालते ते आतां सांगतात--] (७) कल्पान्ती सर्व भूतें हे कौंतेया ! माझ्या प्रकृतीस येऊन मिळतात, आणि कल्पारंभी (म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी) मीच त्यांना पुनः निर्माण करितो. (८) मी आपल्या प्रकृतीला हाती धरून (स्या) प्रकृतीच्या ताब्यात गेल्याने अवश म्हणजे परतंत्र (अर्थात् ज्याच्या त्याच्या कर्माने बद्र) झालेला हा भूतांचा सर्व समुदाय पुनः पुनः निर्माण करितो. (९) (पण) हे धनंजया! ( या सृष्टि निर्माण करण्याच्या) कर्मात माझी आसक्ति नसून मी उदासीनासारखा रहात असल्यामुळे ती कमैं मल बंधक होत नाहीत. (१०) मी अध्यक्ष होऊन प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टि प्रसवितो. या कारणामुळे हे कौंतेया ! जगाची ही घडामोड चालली आहे. । ब्रह्मदेवाच्या दिवसास (कल्पास) आरंभ झाला म्हणजे अध्यक्त प्रकृतीपासून व्यक्त सृष्टि निर्माण होऊ लागत्ये है पूर्वीच्या अध्यायांत सांगितले (८.१८) पण परमेश्वर प्रत्येकाच्या कर्मात्रमाणच त्याला बरा. वाईट जन्म देत असल्याने स्वतः या कर्मापासून अलिप्त आहे इ. तुलासा येथे अधिक सांगितला आहे. शास्त्रीय प्रतिपादनांस ही सर्व