पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ९. ५९५ $$ मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्यवस्थितः ॥ ४॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥ यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥ (४) मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सर्व जग विस्तारिले किंवा व्यापिले आहे. माझ्या ठायीं सर्व भूते आहेत, मी त्यांच्या ठायीं नाही. (५) आणि माझ्या ठायीं सर्व भूतहि नाहीत ! पहा (कशी ही) माझी ईश्वरी करणी किंवा योगसामर्थ ! भूते अस्पन्न करणारा माझा आत्मा भूतें धारण करूनहि (पुनः) भूतांत नाही ! (६) सर्वत्र वावरणारा महान् वायु ज्याप्रमाणे सर्वदा आकाशाच्या ठायीं, त्याप्रमाण सर्व भते माझ्या ठायीं आहेत असे समज. । परमेश्वर निर्गुण व सगुण असल्यामुळे हा विरोधाभास होतो (सातव्या अध्यायांतील श्लोक १२ वरील टीका, आणि गीतारहस्य प्रकरण ९ पृ. २०२, २०५ व २०६ पहा). याप्रमाणे स्वतःच्या स्वरू- पाचे आश्चर्यकारक वर्णन करून अर्जुनाची जिज्ञासा जागृत केल्यावर, आतां आपल्यापासून व्यक्त सृष्टि कशी होते व आपलों व्यक्त रूप कोणती याचे पूर्वी (गी. ७.४-१४, ८.१७-२०) सातव्या व आठन्या अध्या- यांत जे वर्णन केले आहे तेच थोड्या फरकाने प्रसंगानुसार भगवान् पुन: करितात. 'योग' या शब्दाचा अर्थ अलौकिक सामय किंवा युक्ति असा जरी केला, तरी अव्यक्ताच व्यक्त बनण्याचा हा योग किंवा युक्ति म्हणजेच माया होय, है गीता ७.२५ वरील टीकेत व रहस्थाच्या नवध्या प्रकरणांत (पृ. २३४-२३७) प्रतिपादन केले आहे. हा 'योग' परमेश्वरास अत्यंत सुलभ किंबहुना परमेश्वराचा दास असल्यामुळे - - - - - - -- .