पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अभ्याय १. ५ अन्ये च बहवः शूरा मदथें त्यक्तजीविताः।। नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ ९ ॥ अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १० ॥ सैन्याचे वर्णन करीत असतां दुर्योधनाच्या तोंडांतूम गीतेतील वरील श्लोकांसारखेच श्लोक अक्षरशः बाहेर पडले आहेत (भीष्म. ५१.४-६); व सर्व सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हर्षान हे वर्णन केले असल्यामुळे या ठिकाणी 'अपर्याप्त' याचा "अमर्यादित, अफाट किंधा अगणित" याखेरीज दुसरा अर्थच संभवत नाही. 'पर्याप्त ' या शब्दाचा धात्वर्थ " सभोवार (परि) वेष्टन करण्यासारखें (आप-प्रापणें )" असा आहे. पण "अमुक कामासाठी पर्याप्त" किंवा "अमक्याला पर्याप्त" याप्रमाणे पर्याप्त शब्दामागे दुसर चनुययक पद धालन प्रयोग केला म्हणजे "स्या स्था कामाला पुरे पडणारे किंवा समर्थ' असा पयांत शब्दाचा अर्थ होतो; आणि पर्याप्त' याच्या मागे जर काहीं शम् नसेल तर म्हणजे नुसत्या 'पयांप्त' शब्दाचा" पुरेसे मोजके, ज्याची गणती करितां येत्ये" असा अर्थ होतो. उदाहरणार्थ, 'पर्याप्त' याशी समानार्थक " पासून टाकण्यासारखें" हे मराठी शब्द घ्या. “अमक्याला ग्रासून टाकण्या. सारखे" असे म्हटले म्हणजे त्याला पुरून उरणारे असा अर्थ होतो; आणि नुसतेच "ग्रासून टाकण्यासारखें" अ म्हटले म्हणजे दुसरा कोणी त्याला प्रामुन टाकील असा अर्थ होतो. प्रस्तुत श्लोकांत पर्याप्त सम्मामार्गे दुसरा शब्द नसल्यामुळे हा दुसरा अर्थच या ठिकाणी विवक्षित आहे व भार- साखेरीज इतरत्रहि तसे प्रयोग असल्याचे उदाहरण ब्रह्मानंदगिरी टीफेंत दिलेलं आहे. दुर्योधन भिऊन आपले सैन्य अपर्याप्त किंवा अपुरे म्हणतो अशी जी उपपत्ति कित्येकांनी दिली आहे ती बरोबर नाहीं; कारण दुर्योधन भ्यालेला होता असे कोठेच वर्णन नसून, उलट दुर्योधनाचे