पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अस्माकं तु विशिष्टा ये तानियोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान्ब्रवीमि ते ॥७॥ भावान्भीमश्च कर्णश्च कृपश्च समितिजयः । अश्वत्थामा विकर्णश्च लौमदत्तिस्तथैव च ॥ ८ ॥ भीम व अर्जुन यांचा मामा होता असे वर्णन आहे (म.भा. उ. १७१.२) युधामन्यु व उत्तमौजा हे दोघे पांचाल्य, व चेकितान हा एक यादव होता. युधामन्यु व उत्तमौजा हे युद्धांत अर्जुनाचे चक्ररक्षी होते. शैव्य हा शिबि देशाचा राजा होय. (७) हे द्विजश्रेष्ठा! आता आमच्या प्रमुख बाजूचे प्रमुख माझ्या सैन्याचे जे नायक स्यांची नावे दिग्दर्शनार्थ आपल्यास सांगतो. ती लक्षात घ्या (4) आपण आणि भीष्म आणि कर्ण व युद्धांमध्ये जय पावणारा कृप, अश्वत्थामा आणि विकर्ण (दुर्योधनाच्या शंभर भावांपैकी एक) व तसाध सोम- दत्ताचा पत्र ( भूरिश्रश),(१) आणि याशिवाय दुसरे पकल शूर माझ्या साठी प्राण देण्यास तयार असून, सर्वच नाना प्रकारच्या शस्त्रांनी लढणारे व युद्धामध्ये प्रवीण आहेत. (१०) या प्रकारचे आमचे भीमाने रक्षण केलेले सैन्य अपर्याप्त म्हणजे अपरिमित किंचा अफाट, तर भीमाने रक्षिलले यांचे हे सैन्य पर्याप्त ह्मणजे परिमित किंवा मोजके आहे. [या श्लोकांत पर्याप्त आणि अपर्याप्त या शब्दांचे अर्थ कसे लावा. लयाचे याबद्दल मतभेद आहे. 'पर्याप्त' याचा सामान्य अर्थ 'पुरेसे' असा असल्यामुळे " पांडवांचं सैन्य पुरे आणि आमचे अपुरे ( अपर्याप्त आहे," असा अर्थ कित्येक करितात. पण हा अर्थ बरोबर नाही. पूर्वी उद्योगपर्वात धृतराष्ट्रास आपल्या सैन्याचे वर्णन देतांना वर सांगित. लेल्या प्रमुख सेनानायकांची नावे सांगून "माझे सैन्य मोठे व गुणवान् असल्यामुळे मलाच जय मिळणार" असे दुर्योधनाचे उद्गार आहेत (8. ५४.६०-७०); तसेंच भीष्मपर्वात पुढे द्रोणाचार्या जवळ पुन: