पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः। भिप्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ।। ११ ॥ सैन्य मोठे म्हणून पांडवांनी वत्र नांवाचा व्यूह रचिला आणि कौरवांचे मोठे सैन्य पाहून युधिष्ठिराला विषाद वाटला (म. भा. भीम, १९.५ व २१.) अशी वर्णने आहेत. पांडवांच्या सैन्याचा सेनापति धृष्टद्युम्न असतां भीमाने रक्षिलेले' असे म्हणण्याचे कारण असे की, पहिल्या दिवशी वन नांवाचा पांडवांनी जो व्यूह रचिला होता, त्याच्या रक्षणार्थ या व्यूहाच्या अग्रभागी भीमाचीच योजना केलेली होती; व म्हणून सेना रक्षक या नात्याने तोच तेव्हां दुर्योधनाला पुढे दिसत होता (म. भा. भीष्म, १९. ४-११,३३,३४); आणि याच अर्थी 'भीमनेत्र' व 'भीन्मनेत्र' अशी या दोन सैन्यांची वर्णने गीतेच्या पूर्वीच्या महा- भारताच्या अध्यायांतून (म. भा. भीष्म. २०.१ पहा) आलेली आहेत.] (११) (तरी आतां) नेमून दिल्याप्रमाणे सर्व अयनांत म्हणजे सन्या- च्या निरनिराळ्या प्रवेशदात राहून तुम्हीं अबव्यांनी मिळून भीमाचेच सर्व बाजूंनी रक्षण करावें. सेनापती भीष्म हे स्वतः पराक्रमी कोणालाही हार न जाणारे असतां सर्वांनी सर्व बाजूंनी त्यांचं रक्षण केले पाहिजे असें म्हणण्याचे कारण दुर्योधनाने दुसन्या ठिकाणी (म. भा. भी. १५, १५-२०, ९९. ४०.४१) असे सांगितले आहे की, शिखंडीवर आपण शस्त्र धरणार नाही असा भीष्मांचा निश्चय असल्यामुळे शिखंडीकडून भीष्मांचा घात होण्याचा संभव होता म्हणून सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे- __ अरक्ष्यमाणं हि वृको हन्यात् सिंह महाबलम् । मा सिंह जंबुकेनेव घातयेथाः शिखंडिना ।। "महाबलवान् सिंहाचे रक्षण केले नाही तर लांडगा त्याला मारील; ' '- - - - - -