पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्य सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥ अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्थास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३॥ होशील, ते हे मी तुला सांगतो (ऐक). (२) हे (ज्ञान) सर्व गुह्यांत राजा म्हणजे श्रेष्ठ, राजविद्या म्हणजे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष बोध होणारे, आचरण्यास सुखकारक, अव्यय आणि धर्म्य आहे. (३) या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष हे परंतपा ! मला येऊन न मिळतां मृत्युयुक्त संसाराच्या मार्गात परत येतात; (म्ह० स्यांना मोक्ष मिळत नाही). [दुसऱ्या श्लोकांतील 'राजविद्या, ' 'राजगुह्य, ' 'प्रत्यक्षावगम,' या पदांच्या अर्थाचा विचार गीतारहस्याच्या तेराव्या प्रकरणांत (पृ. ४१०-४१४ ) केला आहे तो पहा. ईश्वरप्राप्ताच्या साधनांस उपनिष- दांतून 'विद्या' असे म्हणातात व त्या गुप्त ठेवण्याचा प्रघात होता. भक्तिमार्ग किंवा व्यकाची उपासना ही विद्या या सर्व गह्य विद्यांत श्रेष्ठ किंवा राजा असून, शिवाय हा धर्म प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसणारा अतएव आचरण्यास सुलभ आहे असे म्हटले आहे. तथापि इक्ष्वाकु वगैरे राजांच्या परंपरेनेच हा योग प्रचारांत आला असल्यामुळे (गी. ४.२) या मार्गास राजांची म्हणजे थोर पुरुषांची विद्या या अर्थानेंहि राजविद्या असे म्हणता येईल. कोणताहि अर्थ घेतला तरी अक्षर किंवा अव्यक्त यामाच्या ज्ञानास अनुलक्षून हे वर्णन नसून, या राजविद्या या शब्दाने भक्तिमार्गच या ठिकाणी विवक्षित आहे, हे उघड आहे. असो; याप्र- माणे आरंभीच या मार्गाची प्रशंसा करून भगवान् आतां स्वाचे विस्ताराने वर्णन करितात--]