पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 6. १४७ FF सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद्ब्रह्मणो विदुः । रात्रि युगसहस्रांतां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७॥ केव्हा तरी या लोकी) पुनरावर्तन म्हणजे परत फिरणे (भाग) आहे. पण हे कौंतेया ! मला येऊन मिळाले म्हणजे पुनर्जन्म नाही. [सोळाव्या श्लोकांत 'पुनरावर्तन' या अब्दाचा अर्थ पुण्य संपल्या- वर भूलोकी परत येणे असा आहे (गी. ९.२. म. भा. वन. २६. पहा). यज्ञ, देवताराधान, वेदाध्ययन वगरे कर्मानी इंद्रलोक, सूर्यलोक किंव. हुना ब्रह्मलोक जरी प्राप्त झाला तरी पुण्यांश सरल्यावर तेथून पुनः मागे फिरून इहलोकी जन्म घ्यावा लागतो (बृ. ४.४. ६), किंवा निदानपक्षी ब्रह्मलोकाचा नाश झाल्यावर तरी पुनर्जन्मचक्रांत पडणे जरूर पडते. म्हणून या सर्व गति हलक्या प्रतीच्या होत, आणि परमे- श्वराच्या ज्ञानाने च पुनर्जन्म नष्ट होत अपल्यामुळे ती गति सर्वात श्रेष्ट असा १६ व्या श्लोकाचा भावार्ध आहे (गी. ९.२०.२१ ). ब्रह्म- लोकप्राप्तिहि अनित्य असे जे शेवटी सांगितले तत्समर्थनार्थ ब्रह्मलो. कासुद्धा सर्व सृष्टीची उत्पत्ति व लय पुनः पुनः कसा होत असतो ते आतां सांगतात-- (१७) अहोरात्र म्हणजे काय हे (तत्वतः) जाणणारे पुरुष (कृत, त्रेता द्वा. पर व कलि ही चार युगे मिळून एक महायुग, व अशा) हजार (महा.) युगांचा जो काल तो ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि (तसल्याच) हजार युगांची (स्याची) एक रात्र होते, असे समजतात. श्लोक यापूर्वीचे युगमानाचे कोष्टक न देतां गीतेत आला आहे; व त्याचा अर्थ अन्यत्र दिलेल्या कोष्टकावरून केला पाहिजे. हे कोष्टक वं गीतेतला हा श्लोकहि भारतांत (शां २३३.३.) आणि मनुस्मृतीत

( मनु. १.७३ ) आलेला असून यास्काच्या निरुतांतहि तोच