पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अव्यक्ताद्वयक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे । राध्यागमे प्रलीयन्ते तत्रैचाव्यक्तसंक्षके ।। १८ ॥ भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । राध्यागमेऽवशः पाथे प्रभवत्यहरागमे ।। १९॥ SS परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः। अर्थ वर्णिला आहे ( निरुक्त. १४.९ ), ब्रह्मदेवाच्या दिवसासच कल्प असें म्हणतात. अव्यक्त म्हणजे सांख्यशास्त्रांतील अध्यक्त प्रकृति असा पुढील श्लोकांत अर्थ आहे, अध्यक्त म्हणजे परब्रह्म नव्हे; कारण ब्रह्मरूपी अव्यक्त या श्लोकांत वर्णिलेल्या अव्यक्तापलीकडचे व भिन्न आहे असे पुढे २० व्या श्लोकांत स्पष्ट सांगितले आहे. अध्यक्ता- पासून व्यक्त सृष्टि कशी होत्ये याचा पूर्ण खुलासा व कल्पाच्या काल. मानाचे कोष्टकहीं गीतारहस्याच्या आठव्या प्रकरणांत (पृ. १९०) दिली आहेत ती पहा.] (१८) हा (ब्रह्मदेवाचा) दिवस सुरू झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त (पदार्थ) निर्माण होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याच पूर्वोक्त अव्यक्तांत लय पावतात. (१९) भूतांचा तोच हा समुदाय (याप्रमाणे) पुनःपुनः जन्मून अवश होत्साता, म्हणजे स्वतः इच्छा असो वा नसो, (यंत्रांत घासल्याप्रमाणे ) रात्र सुरू झाली की लय पावतो, आणि हे पार्था ! दिवस सुरू झाला की (पुनः) जन्मतो. । [अर्थात् पुण्यकांनी नित्य ब्रह्मलोकास जरी प्राप्त झाला तरीहि प्रलयकाळी ब्रह्मलोकाचाहि नाश होस असल्यामुळे प्राण्यांना पुनः नव्या कल्पाच्या आरंभी जन्म घेणे चुकत नाही, तो चुकविण्यास जो एकच मार्ग आहे तो आता सांगतात-