पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

--- श्रीमद्भगवद्गीता. यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥५॥ केवळ अधियज्ञास किंवा अधिदेहासच उद्देशून नसून अध्यारमादि पूर्वपदां- शीहि स्यांचा संबंध विवक्षित आहे. म्हणून एकंदर अर्थ असा होतो की, निरनिराळे यज्ञ घ्या, अनेक पदार्थातील अनेक देवता घ्या, विनाशी पंचमहाभूतें ध्या, पदार्थमात्रांचे सूक्ष्म भाग किंवा भिन्नाभिन्न आत्मे ध्या, ब्रह्म ध्या, कर्म घ्या किंवा निरनिराळ्या मनुष्यांचे दह घ्या, सर्वत्र 'मीच' म्हणजे एकच परमेश्वरतत्त्व आहे. कित्येकांचे असें झणणे आहे की, ' अधिदेह ' स्वरूपाचे या ठिकाणी स्वतंत्र वर्णन नसून अधि- यज्ञाची व्याख्या करितांना त्यांत अधिदेहाचा पर्यायाने उल्लेख आलेला आहे. पण आम्हांस हा अर्थ बरोबर वाटत नाही. कारण गीतेतच नव्हे, तर उपनिषदांत व वेदान्तसूत्रांत (बृ ३. ७; वे. सु. १.२.२०) हा विषय जेथे आलेला आहे तेथें अधिभूतादि स्वरूपाबरोबरच शारीर आत्म्प्राचाहि विचार केला असून, सर्वत्र एकच परमात्मा आहे असा सिद्धान्त केला आहे. तसेच गीतेत अधिदेहाबद्दल पूर्वी पश्नहि असल्या- मुळे येथे त्याचा पृथकू उल्लेखच विवक्षित आहे, असे मानणे सयुक्तिक होय जे काही आहे ते सर्वच जर परब्रह्म, तर अधिभूतादि त्याची स्वरूपं सांगतांना त्यांत परब्रह्माचीही गणना करण्याची जरूर नव्हती, असें सकृद्दर्शनी वाटण्याचा संभव आहे. परंतु ब्रह्म निराळे, आत्मा निराळा, देवता निराळ्या, यज्ञनारायण निराळा, अशा रीतीने अनेक भेद करून नानाप्रकारच्या उपासनेत गुंतलेल्या लोकांस अनुलक्षन नानात्वाचे हे वर्णन असल्यामुळे त्या लोकांच्या समजुतीप्रमाणे होणाऱ्या भेदाची लक्षणे सांगून नंतर " हे सर्व मोच आहे" असा सिद्धान्त केला आहे, हे लक्षांत आणिले म्हणजे स्यांत कोणतीच शंका रहात नाहीं, असो; आधिभूत, अधिदेवत, अध्यात्म, अधियज्ञ, अधिदेह इत्यादी प्रकारे उपासनेसाठी जरी अनेक भेद केल तरी हे नानात्व खरें नसून वस्तुतः एकच परमेश्वर सर्व व्यापन राहिला आहे असें या भवा-