पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर वटीपा-अध्याय ८, 55 अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । 'म्हणून' 'अक्षर' शब्दापुढे 'परम' हे विशेषण घालून ब्रह्माची व्याख्या दिली आहे (गीतार. प्र. ९ पृ. १९८ व १९९ पहा). ' स्वभाव' या शब्दाचा अर्थ महाभारतातील वर दिलेल्या उदाहरणांना अनुसरून कोणत्याहि पदार्थाचे 'सुक्ष्म स्वरूप ' असा आम्ही केला आहे. नासदीय सुक्तांत श्य जगहे परब्रह्माची विसृष्टि (विसर्ग) होय असे म्हटले आहे (गी. र. पृ. २५२), व विसर्ग शब्दाचा तोच अर्थ येथे घेतला पाहिजे. विसर्ग म्हणजे यज्ञांतील हविरुत्सर्ग असा अर्थ करण्याची जरूर नाही. या दृश्य सृष्टीलाच कर्म का म्हणतात याचे विवेचन गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत (पृ. २५९) सविस्तर केले आहे ते पहा. 'क्षर' ह्मणजे पदार्थमात्रा, नामरूपात्मक विनाशी स्वरूप होय; आणि यापलीकडचं जें अक्षर तत्त्व ते ब्रह्म समजावयाच. 'पुरुष' या शब्दाने सयातला पुरुष, पाण्याची देवता किंवा वरुणपुरुष, इत्यादि सचेतन सूक्ष्मदेहधारी देवता विवक्षित असून हिरण्यगर्भाचाहि त्यांतच समावेश होतो. 'अधियज्ञ' शब्दाची व्याख्या भगवंतांनी येथे दिली नाही. कारण, यज्ञाबद्दल मागे तिसन्या व चवथ्या अध्यायांत सविस्तर वर्णन असून “ मीच सर्व यज्ञांचा प्रभु व भोक्ता आहे" असें पुन, पुढेहि सांगितले आहे (गी. ९.२४; ५.२९; आणि म. भा. शां. २४० पहा). अध्यात्मादिकांची याप्रमाणे लक्षणे सांगितल्यावर शेवटी ' अधियज्ञ' (ज्याला ह्मणतात) तोच मी या देहांत आहे, झणजे मनुष्यदेहांत ल अधिदेव व अधियज्ञहि मीच आहे असें संक्षेपाने म्हटले आहे. सांख्य प्रत्येक देहांत निराळा आरमा (पुरुष) मानून ते असंख्य आहेत असे म्हणतात. पण वेदान्तशास्त्राला हे मत मान्य नसून देह अनेक असले तरी सर्वांत एकच आत्मा आहे असे त्यांनी ठरविले आहे (गीतार. प्र. ७. पृ. १६३). हाच सिद्धान्त ' अधिदेह मीच' या वाक्यांत येथे दर्शविला आहे. तथापिया वाक्यांतील 'मीच आहे शब्द - - - - -


-