पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 6. यं यं वापि स्मरन्मापं त्यजत्यंते कलेवरम् । तं तमेवैति कौंतेय सदा तद्भावभावितः॥६॥ तील तथ्य सांगून, आतां अंतःकाळी या सर्व सर्वव्यापी भगवंताला कसा ओळखतात असा जो अर्जुनाचा शेवटचा प्रश्न त्याचे उत्तर सांगतात---] (५) आणि जो अंतकाळी माझंच स्मरण करीत देह सोदितो तो श्या स्वरूपाला येऊन पोचतो, यांत संशय नाही. (६) अथवा हे कौंतेया! ग्दा म्हणजे जन्मभर त्यांतच रंगून गेल्यामुळे मनुष्य ज्या ज्या भावाचे मरण करीत अखेरीस देह सोडितो, त्या त्याच (भावाला) तो (पुढे) गाऊन पोचतो. । [पांचव्या श्लोकांत मरणसमयीं परमेश्वराचे स्मरण करण्याची अवश्पकता व फल सांगितले. पण तेवढ्यावरून केवळ मरणकाली स्मरण केल्याने भागते अशी कोणाची गैरसमजत होण्याचा संभव आहे. यासाठी सहाच्या शोकांत, जन्मभर में मनांत असते ते मरणकालीहि सुटत नाही असे सांगून मरणकालींच नव्हे तर जन्मभरहि परमेश्वराचे स्मरण व उपासना करण्याची अवश्यकता सिद्ध केली आहे (गीतार.प्र. 1. पृ. २८५).हा सिद्धान्त स्वीकारिला म्हणजे अंतकाली परमेश्वराला भजणारे परमेश्वराला पोचतात व देवतांचे स्मरण करणारे देवतांना पोंच- तात हेहि आपोआप सिद्ध होते (गा.७.२३, ८.१३ व १.२५ पहा). कारण छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे "यथातुरस्मिलोके पुरुषो भवति तथेतः प्रेत्य भवति" (छां. ३.१४. १)ज्याप्रमाणे या लोकी मनुष्याचा ऋतु झणजे संकल्प असतो त्याप्रमाणे मेल्यावर त्याला गति मिळत असत. छांदोग्याप्रमाणे इतर उपनिषदांतूनहि याचसारखी वाक्ये आहेत (प्रश्न. ३. १०; मैञ्यु. ४. ६), परंतु गीता आतां असें सांगत आहे की, सर्व जन्मभर एकाच भावनेत मन रंगून गेल्यानेरीज अंत-