पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. 1 श्रीभगवानुवाच । अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भृतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंशितः ॥ ३ ॥ अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियशोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४ ॥ [ब्रह्म, अध्यारम, कर्म, अधिभूत आणि अधियज्ञ हे शब्द मागच्या अध्यायांत आहेत; पण आतां अर्जुनाने त्यांखेरीज अधिदेह कोण हा नवीन प्रश्न केला आहे हे लक्षात ठेविलें ह्मणजे पुढील उत्तराचा अर्थ ध्यानांत येण्यास अडचण पडणार नाही.] श्रीभगवान् मणाले--(३) (सर्वांहून) परम असे जे अक्षर ह्मणजे कधीहि नाश न पावणारे तत्त्व ते ब्रह्म, (व) प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मुळ भाव (स्व-भाव) त्यास अध्यात्म असे हाणतात. (अक्षर ब्रह्मापासून) भूतमात्रादि (चराचर ) पदार्थांची उत्पत्ति करणारा जो विसर्ग झणजे सृष्टिव्यापार त्याचे नांव कर्म. (४) ( उत्पन्न झालेल्या सर्व भूतांची) क्षर म्हणजे नामरूपात्मक किंवा नाशवंत अशी जी स्थिति ते अधिभूत अणि (या पदार्थात ) जो पुरुष मणजे सचेतन अधिष्ठाता तो अधि- देवतः (ज्याला) अधियज्ञ (म्हणजे सर्व यशांचा अधिपति म्हणतात तो) मीच. हे देह धान्यांत श्रेष्ठा ! या देहाच्या ठायीं (अधिदेह) आहे. [तिसया श्लोकांतील ' परम' हा शब्द ब्रह्मा, विशेषण नसून अक्षराचे विशेषण आहे. सांख्य शास्त्रांत अव्यक्त प्रकृतीलाहि अक्षर' असे म्हणतात (गी. १५.१६). पण वेदास्यांचे ब्रह्म या अम्मत व अक्षर प्रकृतीच्याहि पलीकडचे आहे (याच अध्यायांतील श्लोक २० व ३. पहा); व त्यामुळे नुसता 'अक्षर' शब्द वापरला तर सांख्यांची प्रकृति किंवा ब्रह्म असे दोन्ही अर्थ होऊ शकतात. हा संशय राहूं नये