पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. 56 अन्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । । [सामान्य लोकांची अशी समजूत असत्ये की, परमेश्वर जरी मोक्षदाता असला तरी संसारांत लागणाच्या ज्या अनेक इच्छित वस्तु स्या देण्याची शक्ति देवतांनाच असते; व त्यासाठी या देवतांचीच उपासना केली पाहिजे. देवतांची उपासना याप्रमाणे प्राप्त झाल्यावर जन्मतः ज्याची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे (गी १७.१-३ पहा) कोणी म्हसोबाच्या, तर कोणी शनिवार करून शनीच्या, नादी कसे लागतात याचे वरील श्लोकांतून सुंदर वर्णन केले आहे. यांत पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, निरनिराळया देवतांच्या आराधनेने जे फल प्राप्त होते, ते त्या त्या देवता देतात असें जरी आपण मानीत असलो, तरी पर्यायाने ते परसे- श्वराचे आराधन होऊन (गी. ९.२३) तारिखकदृष्टया ते फलहि परमेश्व- रच देत असतो (श्लो. २२); इतकेच नव्हे, तर या देवतेचे आराधन करण्याची बदिहि मनुष्याच्या पूर्वकर्मानुसार परमेश्वरच देत असतो (श्लोक २१). कारण या जगांत परमेश्वराखेरीज दुसरे काही नाही. वेदान्तसूत्रांत (३. २.३८-४१) व उपनिषदांतहि हाच सिद्धान्त दिला आहे (कौषी. ३.८) या निरनिराळ्या देवतांची भकि करितां करिता वृद्धि स्थिर व शुद्ध होऊन अखेर एक व नित्य परमेश्वराचे ज्ञान होते हा या भिन्नभिन्न उपासनांचा उप- योग आहे. पण तत्पूर्वी जी फले मिळतात ती सर्व अनित्य होत' म्हणून या फलांच्या आशत न गंततां ज्ञानी' भक्त होण्याची उमेद प्रत्येकाने ठेवावी असा भगवंतांचा उपदेश आहे. भगवान् सर्व गोष्टी करणारे व सर्व फलें देणारे असले तरी भगवान् ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फल देत असल्याने (गी, ४.११) तास्विकदृष्टया ते आपण होऊन काहीच करीत नाहीत असेंहि म्हणतात (गी. ५.१४) गीतारहस्याच्या १० व्या (पृ. २६४) व १३ (पृ. ४२५) प्रकरणांत याबद्दल ज्यास्त खुलासा केला आहे तो पहा. आता देवताराधनेचे