पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ।। नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः। मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥ । फलहि परमेश्वरच देत असतो, हे विसरून प्रकृतिस्वभावाप्रमाणे लोक या देवतांच्या नादी लागतात, असें जें वर वर्णन केले त्याचे स्पधी. करण करितात-] (२४) अबुद्धि म्ह० मूढ लोक, माझें पर म्हणजे श्रेष्ठ, उत्तमोत्तम आणि भन्यय रूप न जाणितां अव्यक्त अशा मला व्यक्त झालेला मानितात. (२५) मी आपल्या योगरूप मायेने आच्छादित असल्यामुळे सर्वांना (स्वस्वरूपानें ) प्रकट (दिसत) नाही. मी अज व अव्यय आहे हे मूढ़ लोक जाणीत नाहींत. । [योग म्हणजे अब्यक्त स्वरूप सोडून व्यक्त स्वरूप धारण करण्याची युक्ति (गी. ४.६७.१५,९.७ पहा). हिलाच वेदान्ती माया असे म्हणतात, व या योगमायेनें परमेश्वर आच्छादिला असला म्हणजे तो व्यक्तस्वरूपधारी होतो. सारांश, व्यक्त सृष्टि मायिक किंवा अनित्य व परमेश्वर खरा किंवा नित्य असा या श्लोकाचा भावार्थ आहे. परंतु या ठिकाणी व अन्य स्थलीहि 'माया' शब्दाचा अलौकिक किंवा विलक्षण शक्ति असा अर्थ धरून कित्येक लोक ही माया खोटी नरहे, परमेश्वरासारखीच नित्य आहे, असे प्रतिपादन करितात. मायेच्या स्वरूपाचा गीतारहस्याच्या ९ व्या प्रकर- णांत सविस्तर विचार केला असल्यामुळे येथे एवढेच सांगतो की, माया ही परमेश्वराचीच काही तरी विलक्षण व अनादि लाला आहे हे अद्वैत वेदान्तासहि मान्य आहे. कारण, माया ही जरी इंद्रियांनी उत्पा केलेला देखावा आहे, ती इंद्रिये ही परमेश्वराच्या सत्तेनेच हे काम करीत असल्यामुळे माया ही अखेर परमेश्वराचीच लीला म्हणावी लागते.ही माया तत्त्वतः सत्य का मिथ्या एवढाच काय तो वाद आहे: