पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. ७१ तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया ॥ २० ॥ यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥ स तया श्रद्धया युक्तस्तस्या राधनमीहते । लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥ अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् । देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३ ॥ हेतु मनांत ठेवून भक्ति करितात म्हणून ते च्यवनशील, व एकांती प्रतिबुद्ध (म्ह ० जाणते ) श्रेष्ठ असे म्हटले आहे. आणि पुढे " सर्वभू- ताधिवासश्च वासुदेवस्ततो वहम् " सर्व भूतांचे ठायीं मी वास करितों म्हणून मला वासुदेव म्हणतात " अशी 'वासुदेव' शब्दाची आध्या- स्मिक व्युत्पत्ति केली आहे (शां. ३४१.५०), असो; सर्व ठिकाणी जर एकच परमेश्वर आहे तर निरनिराळ्या देवतांची लोक का उपासना करितात, आणि अशा उपासकांस फल काय मिळते याचे आतां वर्णन करितात, (२०) आपआपल्या प्रकृतिनियमाप्रमाणे त्या त्या (स्वर्गादिक फलांच्या ) कामवासनांनी वेडावलेले लोक तो तो ( उपासनेचा) नियम पाळून दुसन्या (निरनिराळया) देवतांच्या भजनी लागत असतात. (२१) जो जो भक्त ज्या ज्या रूपाची म्हणजे देवतेची श्रद्धेने उपासना करू इच्छितो त्याची त्याची ती श्रद्धा मी स्थिर करितो. (२२) मग स्या श्रद्धेने युक्त होत्साता, तो त्या देवतेचे राधन म्हणजे आराधना करूं लागतो आणि मग मीच निर्मिलली ती कामफले स्याला मिळतात. (२३) पण (या) अल्पबुद्धि लोकांना मिळणारे हे फल नाशवत असते (मोक्षासारखे कायमचे टिकणारे नव्हे). देवाचे भजन करणारे देवांकडे जातात, आणि माझे भक्त मजकडे येतात.